Palghar News: कासा अत्याचार प्रकरणाने पेटला संताप; कडक कायद्याची मागणी जोर धरते

उपसभापती निलम गोऱ्हे,सह आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटंबाला व रुग्णालयाला दिली भेट.
Palghar news
Palghar newsPudhari
Published on
Updated on

कासा: पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांची विचारपूस केली असून, वाढत्या गुन्हेगारीवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

या प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी देशातील महिला अत्याचारांची गंभीर आकडेवारी समोर ठेवली. देशात दररोज सरासरी २४ बलात्काराच्या घटना घडत असून, पोस्को अंतर्गत सुमारे १३ हजार प्रकरणे नोंदवली जातात, असे त्यांनी सांगितले. तसेच एका वर्षात सुमारे ५० हजार विनयभंगाच्या घटना घडतात, तर दीड लाख महिलांच्या बेपत्ता होण्याच्या केसेस प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली.

Palghar news
Electric Shock:विजेच्या झटक्याने 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

चाकण, बीड, गोंदिया, बारामती, बदलापूर आणि मावळ येथील घटनांचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक प्रकरणांत ९० दिवसांत चार्जशीट दाखल होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. अत्याचार रोखण्यासाठी कठोर आणि सक्तीचा कायदा करण्याची गरज असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अंधश्रद्धा विरोधी कायदा अधिक कडक करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट देत पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवित, अशा गुन्ह्यांतील आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

Palghar news
Census Duty: जनगणनेच्या कामास नकार; ठाण्यातील 12 शिक्षकांवर गुन्हे

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली असून, वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news