Hedewade Mahalaxmi Temple : हेदवडे महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत २७.९८ लाखांची भर; मौल्यवान दानवस्तूंच्या हिशेबाची मागणी

Palghar Temple Donation News: दानपेटी उघडताना कोणीही मंदिर विश्वस्त उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे
Hedewade Mahalaxmi Temple : हेदवडे महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत २७.९८ लाखांची भर; मौल्यवान दानवस्तूंच्या हिशेबाची मागणी
Published on
Updated on

खानिवडे : मुंबई–अहमदाबाद महामार्गालगत हेदवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सहा दानपेट्यांची शुक्रवारी अधिकृत मोजणी करण्यात आली. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली झालेल्या या प्रक्रियेत तब्बल २७ लाख ९८ हजार १७२ रुपये रोख रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट झाले.

Hedewade Mahalaxmi Temple : हेदवडे महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत २७.९८ लाखांची भर; मौल्यवान दानवस्तूंच्या हिशेबाची मागणी
Palghar News: पालघरमध्ये माता-बाल आरोग्य सेवेला बळ; २०१४-१५ च्या तुलनेत बालमृत्यूत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट

धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक तुषार इंगवे व वरिष्ठ लिपिक तानाजी वाघ यांच्या गावचे सरपंच दिनेश परेड ग्रामस्थ कुशल भोईर, गणेश परेड, अजिंक्य तरे, कुणाल पाटील, यज्ञेश घरत, निलेश जैन, ह्रतिक घरत हे उपस्थित होते. मात्र दान पेटी उघडताना कोणीही मंदिर विश्वस्त उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीलबंद दानपेट्या उघडून रकमेची जी मोजणी करण्यात आली ती गेल्या २८ आठवड्यांत भाविकांनी ही देणगी अर्पण केली होती.

Hedewade Mahalaxmi Temple : हेदवडे महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत २७.९८ लाखांची भर; मौल्यवान दानवस्तूंच्या हिशेबाची मागणी
Palghar News | खोडाळा नगरीत अवतरली पंढरी: संत शिरोमणी नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा उत्साहात

यावेळी ग्रामस्थांनी केवळ रोख रकमेचा नव्हे तर सोने, चांदी व इतर मौल्यवान दानवस्तूंचाही अधिकृत हिशेब जाहीर करावा, अशी मागणी पुन्हा केली आहे. अन्यथा पुढे विश्वस्तांच्या कार्यशैलीवर सवाल उपस्थित केला जाईल असे ग्रामस्थांनी सांगितले. कारण मंदिराच्या उभारणीत स्थानिकांचे मोठे योगदान असूनही विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्रतिनिधित्व नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

Hedewade Mahalaxmi Temple : हेदवडे महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत २७.९८ लाखांची भर; मौल्यवान दानवस्तूंच्या हिशेबाची मागणी
Palghar Crime News: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

यापूर्वीही मंदिराच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार आतापर्यंत चार वेळा अधिकृत दानपेटी मोजणी झाली असून, मंदिर प्रशासनातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news