Palghar Rabi Sowing: दिवाळी संपताच रब्बीच्या पेरण्यांची लगबग; शेतकरी भाजीपाला लागवडीत व्यस्त

पालघर जिल्ह्यात भातकापणीनंतर शेतजमिनींची मशागत-नागरणीला वेग...
Palghar Rabi Sowing
Palghar Rabi SowingPudhari
Published on: 
Updated on: 

खानिवडे: दिवाळीचा सण संपताच पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. खरीप हंगामातील भातपीक कापणीची कामे पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या पेरण्यांसाठी कंबर कसली आहे.

भातखाचरे मोकळी होताच शेतांमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी सुरू झाली असून कुठे मशागत, कुठे वाफे तयार करणे, तर कुठे बियाण्यांची पेरणी अशा कामांची लगबग ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

Palghar Rabi Sowing
Raj Thackeray Kalyan Dombivli Visit: राज ठाकरे २८ आणि २९ नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर

पालघर जिल्ह्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने वाल, तूर, चणा, मूग, काळे उडीद, पावटा, राई, तीळ आदी कडधान्ये व तेलबियांची लागवड केली जाते. खरीप हंगामानंतर भातशेतीतून मोकळ्या झालेल्या जमिनीत उपलब्ध असलेल्या ओलाव्याचा उपयोग करून ही पिके घेतली जातात. जमिनीतील ओलावा टिकून असताना योग्य मशागत करून पेरणी केल्यास पिकांच्या वाढीस पोषक वातावरण मिळते.

त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी रब्बीच्या कामांना प्राधान्य देत आहेत. कडधान्य पिकांबरोबरच भाजीपाला लागवडीकडेही शेतकऱ्यांचा कल आहे. पडवळ, वांगी, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, गवार, चवळी, दुधी भोपळा, कारली, काकडी आणि सफेद कांदा आदी पिकांसाठी शेतकरी वाफे तयार करण्यात आणि बियाण्यांची पेरणी करण्यात व्यस्त आहेत.

Palghar Rabi Sowing
Dombivli MIDC Water Contamination: डोंबिवली एमआयडीसीच्या नळाच्या पाण्यात लालसर अळ्या; आरोग्याचा प्रश्न गंभीर

स्थानिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन अनेक शेतकरी भाजीपाला लागवडीचे नियोजन करीत आहेत. एकीकडे भातकापणीनंतर मोकळ्या झालेल्या शेतजमिनींची मशागत सुरू झाली असून दुसरीकडे रब्बी पिकांच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर ग्रामीण भागात पुन्हा एकदा शेतीच्या कामांची गजबज वाढल्याचे चित्र दिसत आहे.

वसई तालुक्यात साधारणतः १,११७.४० हेक्टर क्षेत्र रब्बी लागवडीखाली येते. मात्र, दोन वर्षांपूर्वी पावसाने अपेक्षेपेक्षा लवकर माघार घेतल्याने रब्बी लागवडीचे क्षेत्र घटून ८५७ हेक्टरवर आले होते. मागील वर्षीही सुमारे ९०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड झाली होती. यंदा खरीप हंगामानंतर जमिनीत उपलब्ध असलेला ओलावा आणि पुढील काळात अनुकूल वातावरण राहिल्यास रब्बी लागवडीचे क्षेत्र पुन्हा वाढून हजार हेक्टरपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

- तरुण वैती, तालुका कृषी अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.