Palghar District Hospital : जिल्हा रुग्णालयाची वैद्यकीय खरेदी वादाच्या भोवऱ्यात ?

आमदार सईद खान यांची आरोग्य राज्यमंत्र्यांकडे तक्रार
Palghar District Hospital
Palghar District Hospitalpudhari photo
Published on: 
Updated on: 

पालघर : हनीफ शेख

जिल्हा रुग्णालय, पालघर यांच्यामार्फत GeM पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या औषध आणि वैद्यकीय साहित्य खरेदीच्या दोन बोलींमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आणि नियमबाह्य अटी असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तांत्रिक मंजुरीनुसार आवश्यक असणाऱ्या तब्बल ७८ जीवरक्षक औषधांना बोलीतून परस्पर वगळण्यात आले असून, यामध्ये प्रतिसर्पविष व प्रतिविंचूविष यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या औषधांचा समावेश आहे.

आदिवासीबहुल असलेल्या पालघर जिल्ह्यात अशा प्रकारच्या जीवरक्षक औषधांची नितांत गरज असताना ती डावलण्यात आल्यामुळे रुग्णहिताच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार विधान परिषदेचे आमदार सईद खान शेख यांनी आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली आहे यामुळे आता पालघर जिल्हा रुग्णालयाकडून होत असलेल्या या औषध खरेदी प्रक्रिया वादा त पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Palghar District Hospital
Kashedi Tunnel lights : महामार्गावरील कशेडी बोगद्यातील अंधार अखेर दूर

बोलींमधील प्रमुख त्रुटी व आक्षेप नोंदवताना यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की महत्त्वाच्या औषधांना वगळले असून यानुसार बोली क्र. (GEM/2026/B/8019134) तांत्रिक मंजुरीतील २७५ पैकी तब्बल ७८ बाबी (अंदाजित किंमत ६८,५४,९१० रुपये) औषधांच्या बोलीतून गाळण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जीवरक्षक व अत्यावश्यक औषधांचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यामध्ये प्रतिसर्पविष ४,००० नग (किंमत रु. ३१,१२,४००/-) स्नेक व्हेनम अँटीसीरम १,५०० नग (किंमत रु. ११,६७,१५०/-) प्रतिविंचूविष ३८७नग (किंमत रु. २,५५,६२१/-) रेबीज मानवी मणोक्लोनल अँटीबॉडी १५० नग (किंमत रु. २,५७,८५०/-) तसेच माता-बाल आरोग्यासाठी आवश्यक असणारी औषधे व लोह-कॅल्शियमच्या गोळ्या, विशिष्ट ब्रँडच्या उत्पादनांची सक्ती वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांच्या बोलीमध्ये कोणत्याही प्रॉप्रायटरी आर्टिकल प्रमाणपत्राशिवाय (PAC) विशिष्ट बँड व उत्पादकांच्या नावांची मागणी करण्यात आली आहे. यामुळे इतर समतुल्य उत्पादक व बँड्स स्पर्धेतून बाहेर पडतात. याशिवाय या प्रक्रियेमध्ये अतिरिक्त आणि जाचक अटी टाकल्याचा आरोप देखील आमदार सईद खान शेख यांनी केला आहे.

Palghar District Hospital
Eco Friendly Ganpati Decoration | टाकाऊ वस्तूंपासून साकारले हुबेहूब त्र्यंबकेश्वर मंदिर! नाशिकच्या रमेश पवार यांची कल्पकता

सदरची खरेदी नियमानुसारच आहे यामध्ये कोणतीही अफरातफर नाही याशिवाय ह्या तक्रारीचे पत्र अद्याप पर्यंत कार्यालयाकडे आलेले नाही तसे काही असल्यास अधिक माहिती घेऊन त्या संदर्भाची पुढील कार्यवाही करू.

डॉ रामदास मराड, जिल्हा शल्य चिकित्सक पालघर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news