Dahanu Gambling Raid | डहाणूत अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १२ जणांवर गुन्हा, मुद्देमाल जप्त

आशागड येथील धोडीपाडा परिसरात उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा
Gambling Raid
Gambling RaidPudhari
Published on
Updated on

Dahanu Illegal Gambling Case

कासा : आशागड येथील धोडीपाडा परिसरात उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर डहाणू पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ९१ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जुगार खेळताना १२ जण आढळून आले. या प्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आशागड, धोडीपाडा येथील प्रकाश धोडी यांच्या मालकीच्या उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये पैशांची देवाणघेवाण करून अवैधरित्या जुगार सुरू असल्याची माहिती डहाणू पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक नागनाथ लाड यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

Gambling Raid
Palghar news: हॉस्पिटलमध्ये मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दणका, शिंदेसेनेतून निलंबन

दोन पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी शेडवर छापा टाकला. त्यावेळी काही जण पैशांवर जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतले.

या कारवाईत रामप्रवेश ओमप्रकाश चौधरी (आशागड, धोडीपाडा), भरत प्रजापती (संतोषी), संजय कांबळे (रामवाडी), दिपक धोडी (चरी), तुषार पाटील, गुड्डू हारवाला, पप्पू परमार, नितेश अलोने आणि चेतन चव्हाण, तसेच तीन अनोळखी व्यक्ती आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ९१ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अंमलदार क्रमांक ११८२ संकेत गाडीलकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gambling Raid
Palghar News : लेखी आश्वासना नंतर आदिवासी संघटनांचे आंदोलन स्थगित

ही कारवाई पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डहाणू पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक नागनाथ लाड, पोलिस उपनिरीक्षक दिनेश आघाव, पोलिस हवालदार समीर मासमार, पोलिस नाईक स्मितेश रावते आणि पोलिस अंमलदार केदा बर्वे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news