चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; चालकासह, सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी
चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात;  चालकासह, सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
Published on
Updated on

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी चांदी वाहतूक करणाऱ्या एका व्हॅनचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकासह सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात;  चालकासह, सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
Palghar Accident | मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी जीआयडीसी येथील मोदी सन्स लिमिटेडकडे तब्बल ६०० किलो चांदीच्या विटांची वाहतूक करण्यात येत होती. या चांदीची अंदाजे किंमत १७ कोटी ६६ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना चारोटी उड्डाणपुलावरील नागमोडी वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.

चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात;  चालकासह, सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
महामार्ग ओलांडताना भरधाव कारची माय-लेकांना धडक; आई ठार, मुलगा गंभीर

यावेळी समोरील वाहनाला जोरदार धडक बसल्यानंतर चांदी वाहतूक करणारी व्हॅन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की व्हॅनचे अक्षरशः तुकडे झाले. अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस तसेच चारोटी महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात;  चालकासह, सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
Palghar Accident : पालघरमध्ये मिनी बसचा भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, 15 जण गंभीर जखमी

अपघातग्रस्त वाहनात मोठ्या प्रमाणावर चांदी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. अपघातानंतर काही काळ परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news