Palghar Murder news | पती घराबाहेर जाताच महिलेची हत्या; आरोपी अटकेत

घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

कासा : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोडगाव खोरीपाडा येथे एका विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कासा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव सुनिता जेठ्या गोवारी (वय ४५) असे असून त्या पती जेठया हाक्या गोवारी यांच्यासोबत मोडगाव खोरीपाडा येथील फॉरेस्ट प्लॉटवरील शेत झोपडीत राहत होत्या.

Murder Case
Raigad Robbery | मित्रानेच रचला ५७ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या लुटीचा कट...!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी सकाळी जेठया गोवारी हे कामानिमित्त बाहेर गेले होते. पती घरी नसल्याची संधी साधून आरोपीने झोपडीत प्रवेश केला. त्यानंतर कोणत्यातरी कारणावरून सुनिता गोवारी यांचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना सकाळी ८ ते रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.

Murder Case
Raigad crime | लोणेरेतील निर्घृण हत्याकांडाचा उलगडा; पाच दिवसांनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुरुवातीला अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी दामा लाडक्या खरपडे (वय ५०, रा. खोरीपाडा, मोडगाव, ता. डहाणू) याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Murder Case
Raigad crime | लोणेरेतील निर्घृण हत्याकांडाचा उलगडा; पाच दिवसांनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नराळे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर महेर तसेच कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन डोगरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news