Palghar Congress protest : पालघर काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन

जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी चेहऱ्यावर मुखवटा घालून नोंदवला निषेध
Palghar Congress protest
Palghar Congress protestpudhari photo
Published on: 
Updated on: 

पालघर : भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांच्या निषेधार्थ पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पालघर तहसील कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी केले.या आंदोलनादरम्यान कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी चेहऱ्यावर मुखवटा घालून निषेध नोंदवला. निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत “निष्पक्षतेच्या मुखवट्यामागे नेमके काय दडले आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

Palghar Congress protest
Thane News : उद्घाटनाचा गाजावाजा, पण आरोग्य केंद्र गवताच्या विळख्यात

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर करताना कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी विविध मुद्द्यांवर लेखी आक्षेप नोंदवल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत मतदार यादी, मतदारांची नावे जोडणे-वगळणे, Form-6 मधील बदल आणि निवडणूक डेटाबेसच्या केंद्रीकरणाबाबत संपूर्ण पारदर्शकता आणि स्पष्टीकरणाची मागणी केली. तसेच माजी केरळ मुख्य सचिव जिजी थॉमसन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत केलेल्या राजकीय स्वरूपाच्या आरोपांवरही स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली.

“आरोप खरे की खोटे, याचा निर्णय आम्ही देत नाही; मात्र भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत असा गंभीर आरोप सार्वजनिक झाल्यानंतर त्यावर स्पष्ट उत्तर मिळणे हा जनतेचा अधिकार आहे,” अशी भूमिका कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी मांडली. यावेळी “निवडणूक आयोग स्वतंत्र असला पाहिजे, त्याच्यावर कोणत्याही सत्तेचा राजकीय दबाव असता कामा नये,” अशी मागणी करण्यात आली.तसेच, “निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था आहे; मग आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असताना BJP राजकीय पातळीवर ज्ञानेश कुमार यांच्या बचावासाठी का पुढे येत आहे?” असा थेट सवालही करण्यात आला.

Palghar Congress protest
Drug destruction : नवी मुंबईत २६.३० कोटींचे ७२६ किलो अमली पदार्थ नष्ट

या आंदोलनाला पालघर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने तरुण नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news