Palghar School: स्वच्छ, हरित विद्यालय मानांकनात पालघरची कामगिरी; ३,१३७ शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण

५ स्टार प्राप्त ११८ शाळांचे बाह्यमूल्यांकन पूर्ण
Palghar School
Palghar SchoolPudhari
Published on: 
Updated on: 

पालघरः विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ व हरित विद्यालय मानांकन २०२६-२७’ उपक्रमात पालघर जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे.

जिल्ह्यातील ३,१३७ शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण झाले असून, स्वयंमूल्यांकनात ५ स्टार मानांकन प्राप्त झालेल्या ११८ शाळांचे बाह्यमूल्यांकनही ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेद्वारे शाळांमधील स्वच्छताविषयक सुविधा, त्यांचा प्रत्यक्ष वापर, देखभाल तसेच पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पडताळणी करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्ह्यातील शाळांनी केलेल्या स्वयंमूल्यांकनात १ स्टार प्राप्त २०, २ स्टार प्राप्त १०८, ३ स्टार प्राप्त १,४९२, ४ स्टार प्राप्त १,३९९ आणि ५ स्टार प्राप्त ११८ शाळांचा समावेश आहे. या मूल्यांकनातून शाळांनी स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणपूरक सुविधांच्या उपलब्धतेबाबत स्वतःच्या कामगिरीचा आढावा घेतला.

Palghar School
Vadhavan Port: वाढवण बंदराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; समुद्रात उतरून सुमारे हजार जणांचे जलसमाधी आंदोलन

बाह्यमूल्यांकनाची प्रक्रिया अचूक आणि एकसमान पद्धतीने पार पाडण्यासाठी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी परीक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये बाह्यमूल्यांकनाची कार्यपद्धती, शाळांमधील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी आणि मूल्यांकनाची माहिती केंद्र सरकारच्या SHVR पोर्टलवर नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रक्रियेत विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती आणि समावेशित शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी परीक्षक म्हणून सहभाग घेतला. परीक्षकांनी संबंधित शाळांना भेटी देऊन स्वयंमूल्यांकनात नोंदविलेल्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी केली.बाह्यमूल्यांकनात शाळांमधील सहा प्रमुख घटकांची तपासणी करण्यात आली.

Palghar School
Mumbai Madgaon Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत आता १६ डब्यांची; १० नोव्हेंबरपासून सहा दिवस धावणार

यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहांची स्वच्छता व वापरण्यायोग्य स्थिती, साबणाने हात धुण्याच्या सुविधा, पाणी व स्वच्छताविषयक सुविधांची नियमित देखभाल, स्वच्छता व आरोग्यविषयक वर्तन परिवर्तन तसेच मिशन LiFE अंतर्गत पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे.

या मूल्यांकन प्रक्रियेत केवळ शाळांमध्ये स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, एवढ्यापुरते मर्यादित न राहता त्यांचा नियमित वापर, देखभाल आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी विकसित होत आहेत का, यालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. स्वयंमूल्यांकनातून शाळांनी स्वतःच्या स्थितीचा आढावा घेतला, तर बाह्यमूल्यांकनातून या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली.

या उपक्रमामुळे शाळांना आपल्या सुविधांची सद्यस्थिती समजून घेण्यासोबतच सुधारणा आवश्यक असलेल्या बाबी निश्चित करून त्यावर नियोजनबद्ध काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी, आरोग्यविषयक जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.