Nalasopara News: दीड वर्षात ३५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; तुळींज पोलिसांची धडक कारवाई

अमली पदार्थांचे वाढते जाळे रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाया सुरू आहेत.
Smuggling
SmugglingFile Photo
Published on
Updated on

विरार: अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नालासोपारा तुळिंज पोलिसांनी गेल्या दीड वर्षात मोठी कारवाई करत एमडी, कोकेन आणि गांजासह तब्बल ३५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईदरम्यान अनेक भारतीय तसेच नायजेरियन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांचे वाढते जाळे रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाया सुरू आहेत.

तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमली पदार्थांचा धोका कमी करून परिसर अमली पदार्थमुक्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

Smuggling
Smuggling Case: लोहमार्ग पोलिसांकडून ५ आंतरराज्यीय तस्करांवर झडप

प्रगतीनगर आणि रहमतनगर यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी सातत्याने कोंबिंग ऑपरेशन तसेच संशयित व्यक्तींची तपासणी सुरू केली आहे. अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असलेल्या टोळ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी घरमालकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

घर किंवा खोली भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूंची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक आहे. भाडेकरूची योग्य पडताळणी न केल्यास आणि त्या व्यक्तीचा अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यात सहभाग आढळल्यास घरमालकाविरुद्धही नियमानुसार कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Smuggling
Thane BJP: १०४ कोटी रुपयांसाठी ठाणेकरांना वेठीस धरू नये; भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची टीका

दरम्यान, ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सुमारे २४० नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. तपासादरम्यान आवश्यक पासपोर्ट व व्हिसा कागदपत्रे उपलब्ध नसलेल्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संबंधितांना त्यांच्या देशात परत पाठविण्याची प्रक्रिया अर्थात निर्वासनाची कार्यवाही करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news