Palghar crime : घरफोडीच्या सराईत टोळीचा पर्दाफाश; ३ जण गजाआड

सोने चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ९ लाख १६ हजार ८०० रुपयांचा मुद्धेमाल हस्तगत
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

खानिवडे : नायगाव पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सोने चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ९ लाख १६ हजार ८०० रुपयांचा मुद्धेमाल हस्तगत करण्यात आला आहे.याचबरोबर नायगाव व काशीमीरा परिसरातील तीन घरफोडीचे गुन्हे ही उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्वेतील कामण गावच्या एका बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.

Crime News
FDA drug store inspection : एफडीएचा मोर्चा आता औषधांच्या दुकानांकडे

ताब्यातील एका आरोपींमध्ये राजस्थान व उत्तर प्रदेश येथील सराईत गुन्हेगारांचा समावेश असून त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे, पालघर व नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या टोळीवर यापूर्वी घाटकोपर, अंधेरी, काकावाडी, भुसावळ, रावळी व पंतनगर पोलीस ठाण्यांतही गुन्हे नोंद आहेत.

Crime News
Bharat Gogawale : दासगाव पुलाला कै. शांताराम भाऊ फिलसे यांचे नाव देणार

ही कारवाई पोलिस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. दरम्यान एवढ्या ठिकाणी घरफोड्या करणार्या टोळीची मोठी दहशतच निर्माण झाली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांच्या मुसक्या आवळल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news