Ganesh Naik News: मोदींच्या नेतृत्वात विकसित भारताची वाटचाल; गणेश नाईक यांचे प्रतिपादन

पंतप्रधानपद भूषवणाऱ्या भूतपूर्व नेत्यांपेक्षा अधिक काळ नरेंद्र मोदी देशसेवेत
Ganesh Naik News
Ganesh Naik NewsPudhari
Published on
Updated on

पालघर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बारा वर्षे पूर्ण केली असुन आजवरच्या भूतपूर्व पंतप्रधान पद भूषवणाऱ्यां पेक्षा अधिक काळ देशाच्या सेवेमध्ये आहेत.नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात विश्वास,विकास आणि विकसित भारताची वाटचाल सुरु असुन हा नेतृत्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे.

पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करणे राजकीय दृष्ट्या याकडे महत्वपुर्ण टप्पा म्हणून पहिले जात आहे.बारा वर्षांच्या कालखंडाकडे सुशासन,सातत्य आणि विकासाभिमुख जनविश्वाससाचा कालखंड म्हणून पहिले जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

Ganesh Naik News
Mobile Game Addiction: मोबाईल गेमच्या विळख्यात हरवतेय बालपण

मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांची जिल्हा परिषदेच्या बिरसा मुंडा भावनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना लोकसभेच्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नागरिकांनी विकासाभिमुख नेतृत्वाला समर्थन दिल्याचे सांगत एनडीए आघाडीच्या माध्यमातून देशातील 22 राज्यात असलेली सरकारे जनतेची सेवा करत आहे.

बारा वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट लाभ,पायाभूत सुविधा, संरक्षण व्यवस्था,देशाचा आर्थिक विकास साधत चौथ्या क्रमांकांची अर्थ व्यवस्था होण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु असल्याची माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील २ वर्षे मिळून एकूण १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, जो देशाच्या सेवेतील एक ऐतिहासिक टप्पा आहे.

सलग तीन वेळा देशाचे नेतृत्व करत सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून सेवा देण्याचा मान मिळवला आहे.पंतप्रधान म्हणून सलग ४,३९९ दिवसांचा हा कार्यकाळ भारतीय राजकारणातील एक मैलाचा दगड ठरला आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये देशातील नागरिकांनी विकासभिमुख चित्र आणि त्यांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आज देशातील २२ राज्यांमध्ये जनतेची सेवा करत आहे.सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या संकल्पनेतून देश प्रगती करत आहे. भारताची अर्थव्यवस्था २ ट्रिलियन डॉलरवरून वाढून ४ ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक स्तरावर पोहोचली आहे.

Ganesh Naik News
Thane District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेना-बविआ-भाजप-एनसीपी युतीचा पॅनल; महायुतीमध्ये उभी फूट

भारत जागतिक आर्थिक व्यवस्थेत प्रभावी भूमिका बजावत असून, जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे.देशात सुमारे ७० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आकर्षित झाली आहे.

३० पेक्षा जास्त देशांशी मुक्त व्यापार करार प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट-अप इंडिया या योजनांद्वारे औद्योगिक वाढीला चालना दिली जात आहे.

25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले आहेत.पीएम स्वनिधी योजने अंतर्गत ७४ लाख पथविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे.मुद्रा योजने अंतर्गत ५७ कोटींहून अधिक लोकांना तारणमुक्त कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे ३० लाख कारागिरांना लाभ मिळाला आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पालकमंत्र्यांची दमछाक

पत्रकार परिषदेत पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांची पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दमछाक झाली.स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास, रखडलेले प्रकल्प, रोजगार, रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात पालकमंत्री अपयशी ठरल्याने पत्रकार परिषदेत त्यांची चांगलीच गोची झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news