Dimple Mehta Mayor: मिरा-भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर ‘झिरो टॉलरन्स’चा इशारा; महापौर डिंपल मेहता यांची ठाम भूमिका

पदग्रहणानंतर महापौर-उपमहापौरांचा पहिला निर्णयात्मक सूर; प्रभाग अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची तयारी
Dimple Mehta Mayor
Dimple Mehta MayorPudhari
Published on
Updated on

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता व उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी बुधवारी आपापल्या पदाचा कार्यभार आ. नरेंद्र मेहता, आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थितीत स्वीकारला. यावेळी त्यांनी शहरात वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर चिंता व्यक्त केली.

Dimple Mehta Mayor
KDMC Official Vehicle: केडीएमसीत महापौर-उपमहापौरांना भाडेतत्त्वावरील खाजगी वाहने

शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून भविष्यात होणाऱ्या या बांधकामांना रोखण्यासाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी राबविण्याचा विचार करण्यात येईल, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली. गेल्या महिन्यात पार पडलेल्या पालिका निवडणुकीच्या कालावधीत तसेच त्यापूर्वी शहरातील विविध भागांमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा बांधकामांविरोधात लोकांच्या अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Dimple Mehta Mayor
Wada Rural Hospital Gynecologist: वाडा ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांचा राजीनामा; गदारोळानंतर आरोग्यसेवेवर संकट

अशा अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजित विकासात सतत अडथळा निर्माण होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी तसेच शहराचा नियोजित विकास व शहराचे नियोजन बिघडू नये, याकरिता भविष्यात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम होणार नाही, याची दक्षता पालिकेकडून घेण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबतचे पत्र आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यात अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी राबविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

Dimple Mehta Mayor
Salary During Jail KDMC: जेलमध्ये 40 दिवस असतानाही केडीएमसी कर्मचाऱ्याला पगार; कल्याण-डोंबिवली महापालिकेचा धक्कादायक प्रकार उघड

यावर लवकरच विचार करण्यात येऊन निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्या प्रभागात अनधिकृत बांधकाम होईल, अशा बांधकामासाठी प्रभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, आ. मेहता यांच्या पत्नी सुमन यांसह भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news