Mahavitaran to implement Abhay scheme in Boisar | थकबाकीदार वीज ग्राहकांना 'अभय'ची संधी !

थकबाकीदार वीज ग्राहकांना 'अभय'ची संधी ! महावितरणची अभय योजना बोईसर उपविभागात प्रभावीपणे राबविणार
Mahavitaran to implement Abhay scheme in Boisar | थकबाकीदार वीज ग्राहकांना 'अभय'ची संधी !
Published on: 
Updated on: 

बोईसर : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या थकबाकीदार वीज ग्राहकांना आर्थिक दिलासा देत थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात 'महावितरण अभय योजना २०२६-२७' राबविण्यात येत आहे. या योजनेचा बोईसर उपविभागातील जास्तीत जास्त ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी महावितरण प्रशासनाने कंबर कसली असून, पात्र ग्राहकांपर्यंत योजनेची माहिती पोहो-चविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर बोईसर उप-विभागीय कार्यालयात शाखा अभियंते आणि जनमित्रांची विशेष मार्गदर्शन बैठक घेण्यात आली.

या बैठकीत उपकार्यकारी अभियंता नरेंद्र संगेपू तसेच विभागीय कार्यालयातील व्यवस्थापक यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत ही योजना लागू राहणार असून, योजनेची पात्रता, थकबाकी भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या सवलती आणि योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया याबाबत कर्मचाऱ्यांना तांत्रिक माहिती दिली.

योजनेचा लाभ केवळ कागदोपत्री न राहता तो प्रत्यक्ष पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रत्येक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांशी वैयक्तिक संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेतील सवलती, आर्थिक फायदे आणि थकबाकीमुक्त होण्याची संधी याबाबत ग्राहकांना समजावून सांगून त्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या किंवा आर्थिक अडचणींमुळे वीजबिल भरू न शकलेल्या ग्राहकांसाठी ही योजना दिलासादायक ठरू शकते. त्यामुळे ग्राहकांनी योजनेची माहिती घेऊन निर्धारित मुदतीत तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Mahavitaran to implement Abhay scheme in Boisar | थकबाकीदार वीज ग्राहकांना 'अभय'ची संधी !
Palghar News : पालघर तालुक्यातील नागझरीच्या सरपंचांना पदावरून हटवले

दरम्यान, थकबाकी वसुलीचे साध्य करण्याबरोबरच उद्दिष्ट ग्राहकांना थकबाकीच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने आणि जबा-बदारीने काम करावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता नरेंद्र संगेपू यांनी बैठकीत केले.

Mahavitaran to implement Abhay scheme in Boisar | थकबाकीदार वीज ग्राहकांना 'अभय'ची संधी !
Palghar Weather Forecast : पालघर जिल्ह्यात काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.