Kotwal Recruitment : राज्यातील कोतवाल भरतीला ब्रेक

नाशिक, कोकण विभागाची १५ नोव्हेंबरला होणारी लेखी परीक्षा आता १७ जानेवारी रोजी
Kotwal Recruitment
Kotwal Recruitmentfile photo
Published on: 
Updated on: 

खानिवडे : राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १२ नोव्हेंबर २०२६ रोजी एक महत्त्वाचा शासन आदेश जारी करून कोतवाल पदभरती प्रक्रिया तूर्त पुढे ढकलली आहे. नाशिक आणि कोकण विभागाची १५ नोव्हेंबरला होणारी लेखी परीक्षा आता थेट १७ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.

शासन आदेशानुसार, राज्यात ३१ मे २०२६ रोजी रिक्त असलेली २९१२ कोतवाल पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. ही भरती २८ नोव्हेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्याचे ठरले होते. मात्र, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या चार विभागांतील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

Kotwal Recruitment
Matheran Water Crisis : पर्यटन केंद्र माथेरानमध्ये आतापासूनच टंचाईच्या झळा

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी गट-अ ते गट-ड पदभरतीसाठी वयोमर्यादेत शिथिलता दिली आहे. ही शिथिलता कोतवाल पदाला लागू आहे की नाही, याबाबत महसूल विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे अभिप्राय मागितला आहे. अभिप्राय येईपर्यंत नाशिक व कोकण विभागाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पालघर उप जिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.

भरतीप्रक्रिया ठरली होती संशयास्पद

वसई तालुक्यातील ३१ कोतवाल पदांच्या भरती प्रक्रियेला संशयाचे ग्रहण लागले होते. पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांनी कथितरीत्या चुकीची अथवा बनावट कागदपत्रे सादर करून पात्रता मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुढे आला होता. या संपूर्ण प्रकरणात महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याची चर्चा असून, भरती प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

Kotwal Recruitment
Matheran Tourism : मिनी ट्रेनच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे माथेरानचे पर्यटक घटले

नवीन सुधारित वेळापत्रक

नवीन सुधारित वेळापत्रका प्रमाणे २३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ तालुकानिहाय रिक्त जागांची यादी जाहीर होईल, १ डिसेंबर ते १५ डिसेंबर बिंदूनामावली तयार केली जाईल. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर : जाहिरात कालावधी असणार आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२७ अर्जांची छाननी होईल. तर ८ जानेवारी ते १५ जानेवारी प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. १७ जानेवारी २०२७ लेखी परीक्षा होईल. तसेच १८ जानेवारी २०२७ उत्तरसूची व निकाल घोषणा होणार आहे. १८ ते २५ जानेवारी दस्तऐवज पडताळणी व २६ जानेवारी २०२७ अंतिम नियुक्तीपत्र निर्गमित केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.