

मोखाडा : पालघर ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा अतिशय महत्त्वाचा मार्ग समजला जातो याशिवाय गुजरात मार्गे त्रंबकेश्वर या महत्त्वाच्या देवस्थाने दररोज असंख्य भाविक येत असतात. याशिवाय नाशिक औद्योगिक विकास महामंडळ ते बोईसर तारापूर एमआयडीसीला जोडणारा देखील हाच मार्ग आहे. मात्र सध्या जव्हार आणि मोखाडा यांच्यामध्ये केळकर फरशी या ठिकाणी या रस्त्याची एक बाजू खचल्याचे दिसून येत आहे.
अगदी रस्त्याच्या किनारावर मोठा खड्डा पडला असून या रस्त्याला मोठी चीर देखील आली आहे जर या ठिकाणी दोन वाहने एकमेकांसमोरून आली तर मात्र या खड्ड्याचा अंदाज न येऊन गाडी आपण याच घटना घडलेले आहेत. मात्र आता हा रस्ता अधिकच खचल्याचे चित्र आहे यामुळे या ठिकाणाहून जर एखाद्या अवजड वाहन ट्रक किंवा टेम्पो गेल्यास हा रस्ता थेट कोसळण्याची देखील चिन्हे आहेत.
हा खचलेला रस्ता एका मोठ्या मुलाला लागूनच खचल्याने लांबून हा नादुरुस्त खड्डा दिसून येत नाही यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ त रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.
सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे नुकसान झाले असून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी मोठा होता त्या ठिकाणी अनेक रस्तेखात्ची उदाहरणे आहेत. मात्र पालघर ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर देखील अनेक ठिकाणी भर पावसात रस्ते बंद झाल्याच्या घटना घडल्या यामध्ये मनोर ब्रिज जवळील भाग, यानंतर विक्रमगड येथील पाचमाड जवळील पूल पाण्याखाली गेला होता.
याशिवाय मोखाडा ते त्र्यंबकेश्वर घाटामध्ये देखील आता खड्ड्यांचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे अशातच याच रस्त्याच्या मध्यभागी ज्या ठिकाणी जव्हार मोखाडा हद्द सुरू होते त्याच ठिकाणी या राष्ट्रीय महामार्गावर ब्रिज जवळ एका बाजूने रस्ता खचल्याचे दिसून येत आहे. यामुळे रस्त्याच्या मध्ये खड्डे असणे किंवा रस्ता खराब असणे यासाठी अनेकदा वाहनचालक सावधान होऊन गाडी चालवताना दिसतात.
मात्र ज्या ठिकाणी हा रस्ता खचला आहे ते ठिकाण ब्रिजला लागून असल्यामुळे जव्हार कडून मोखाड्याकडे येणाऱ्या वाहन चालकांना याचा जराही अंदाज येत नाही कारण की समोरून हा खचलेला भाग दिसत नाही यातूनच मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने किमान काम होईपर्यंत त्या ठिकाणी सूचना फलक लावणे किंवा तात्काळ त्या रस्त्याची दुरुस्ती करून घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे असे न झाल्यास जीवित हानी सुद्धा होऊ शकते अशी भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे.
या राष्ट्रीय महामार्गाचे अशी अवस्था असतानाच दुसरीकडे अनेकदा विक्रमगड पासून त्रंबकेश्वर पर्यंत अगदी रस्त्याला लागून मोबाईल कंपन्यांच्या अनेकदा केबल जोडणीचे काम सुरू असते यासाठी रस्त्याला लागूनच खोदकाम केले जाते असेच खोदकाम मोखाडा तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करताना खोदण्यात आलेले आहेत ते बुजवताना व्यवस्थित न बुजवल्या गेल्याने ते रस्ते भुसभुशीत होऊन या अशा पावसात अनेक ठिकाणी ते खसल्याचे दिसून येते असे रस्ते खोदताना कधीही राष्ट्रीय महामार्ग विभागाची किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही.
याशिवाय ज्या अधिकाऱ्यांची हे काम रोखण्याची जबाबदारी आहे ते सुद्धा डोळ्यावर झापड लावून कार्यालयात बसलेले असतात यामुळे अनेकदा जड वाहने अशा रस्त्याच्या बाजूला खचल्याचे देखील दिसून येतात त्यामुळे असे अनधिकृत पणे रस्त्याच्या शेजारी खोदकाम करणाऱ्या कंपन्यावर अंकुश मिळवावा आणि या पावसाळ्यात मोठे अपघात होणार नाही यासाठी या पालघर-नाशिक महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.