

कसारा : मुंबई नाशिक महामार्गवरील कसारा जवळील ओहळाची वाडी जवळ ट्रक, पिकअप, व एका कार गाडीचा भीषण आपघात होऊन 25 जण जखमी झाले असून सर्व जखमी पिकअप गाडीतील होते या जखमी पैकी 7 जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना एस एम बी टी रुग्णालयात हालवण्यात आले.
आज संध्याकाळ च्या सुमारास दशक्रिया विधिस आलेले टाकेद येथील ग्रामस्थ डोळखांब येथून टाकेद ला जातं असता कसारा जवळील ओहळाचिवाडी जवळ पिकअप क्रमांक एम. एच 15 जे डब्लू 1654 च्या चालकाला नाशिक दिशेने जाणाऱ्या ट्रक चा अंदाज न आल्याने पिकअप पुढे असलेल्या ट्रक क्रमांक एम एच 42 टी. 3636 वर जाऊन धडकली त्याच दरम्यान पिकअप च्या मागून येणारी कार क्रमांक एम एच 03 डी जी 5779 ही पिकअप वर जाऊन धडकली ह्या भीषण अपघातात पिकअप ला दोन्ही बाजूने जोरदार धडक बसल्याने पिकअप गाडीतील 27 प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य भास्कर सदगीर, दत्ता वाताडे, शाम धुमाळ, अक्षय लाडके, सतीश खरे, सुनील करवर यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले व जखमीना खासगी रुग्णवहीका, कसारा रुग्णालयातील रुग्णावाहीका, टोल कंपनी च्या रुग्णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जखमींमध्ये महिलांचा समावेश जास्त असून 27 पैकी 4 महिला व 3 पुरुष हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार उमेश चौधरी,अनिल निवळे, संजय चौधरी यांच्या मदतीने एस. एम. बी. टी रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान या भीषण अपघातात कार च्या एअर बॅग उघडल्याने कार मधील 2 प्रवाशी बचावले असून या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात पिकअप चालक विरोधात गुन्हा दाखल झाला असून कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावीत पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान भीषण अपघातातील गंभीर जखमीना आपत्ती व्यवस्थापन टीम च्या सदस्यांनी गोल्डन आवर्स मध्ये रुग्णालयात आणल्यानंतर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आशु शुक्ला व त्यांच्या सहकारी डॉकटर व कर्मचारी यांनी गंभीर जखमीना तात्काळ उपचार सुरु करून त्यांना पुढील उपचारासाठी रवाना केले व किरकोळ जखमीवर योग्य उपचार करीत त्यांना नातेवाईकां कडे सोपवले.