

नुकतेच हिंदु हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे नागपुर मुंबई समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या समृद्धी महामार्गावरील इगतपुरी येथे कसारा घाटातून प्रवास करण्यासाठी अतिशय सुंदर बोगद्याची निर्मिती केली आहे.मात्र मुंबई-नाशिक महामार्ग तसेच कसारा घाट दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
समुद्धी महामार्गामुळे इगतपुरी ते कसारा पुर्वीचे अर्ध्या तासाचे अंतर केवळ आठ मिनिटावर आले आहे. दोन्ही लेनवरील बोगद्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लाईट बसवल्या आहेत. इगतपुरी तालुका हा आदिवासी बहुल असल्याने येथील संस्कृतीचे दर्शन घडावे यासाठी ठिकठिकाणी वारली संस्कृतीचे चित्र कोरली आहेत. या बोगद्यामध्ये फायर सिस्टिम असून तापमान 60 अंशावर गेले की पाऊस चालू होतो आणि 30 अंशावर आल्यावर बंद होतो.
स्थानिक प्रजातींची 33 लाखांहून अधिक प्रजाती झाडे लावण्यात आली आहेत. इगतपुरी ते कसारा बोगदा आठ किलो मीटरचा असुन देशातला सगळ्यात मोठा हा बोगदा आहे. इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे. समृद्धी महामार्गात 5 दुहेरी बोगदे आहेत. बोगदे सुरु होण्यापुर्वी दोन्ही बोगद्याच्या प्रवेशद्धारासमोर पाऊस लागु नये यासाठी महाकाय आधुनिक शेड बांधले आहे.
समृद्धी महामार्गपेक्षा मुंबई आग्रा महामार्गवरील कसारा घाट, इगतपुरी सह अनेक ठिकाणी धुक्याची झालर पाहायला मिळत आहे एकीकडे थंड वारा, फेसळणारे धबधबे व दाट धुके यामुळे कसारा घाट परिसर फुलून गेला आहे मात्र समृद्धी महामार्ग मुळे या महामार्गकडे केंद्र व राज्य शासनाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. महामार्गावरील पडघा ते नाशिक दरम्यान पडलेले खड्डे, ही मोठी समस्या आहे.अनेक वर्ष मुंबई ते नाशिक, सह अन्य ठिकाणी कार्यक्रम, सभा यासाठी जाणार्या मंत्र्यांनी या मुंबई नाशिक महामार्गाच्या विकासासाठी कानाडोळा केला आहे.
दरम्यान या महामार्गवरील कसारा घाटात प्रवाशाच्या सेवेसाठी पर्यटन च्या निमित्ताने घाटातील टोप बावडी, घाटन देवी,उंटदरी, जव्हारफाटा याठिकाणी विकासात्मक कामे करून प्रयत्नाचा आनंदी घेण्यासाठी उपाययोजना कारणणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहुन नाशिकला येण्यासाठी कसारा घाटातही रेल्वेने अनेक बोगदे बांधले आहेत. अनेक बोगद्यांमध्ये लाइट बंद असल्याने भर दिवसाही रेल्वे एक्सप्रेस बोगद्यातून जातांना पुर्ण आंधार जाणवतो. तर पावसाळ्यात बोगद्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरल्याने ते पाणी खिडकीतून प्रवाशांच्या अंगावर पडते. या बोगद्याबाहेर रंगरंगोटी केलेली नाही रेल्वे प्रशासनाने सुद्धा समृद्धी महामार्गावरील बोगद्या प्रमाणे रंगरंगोटी करून देखावे तयार करावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.