Jawhar PWD File Case: चोरीला गेलेली फाईल परत आली, मात्र कागदपत्रे बदलली; जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकार

कागदपत्रे 'चोर' पकडण्याचे जव्हार पोलिसांसमोर मोठे आव्हान
Jawhar PWD File Case
Jawhar PWD File CasePudhari
Published on: 
Updated on: 

हनिफ शेख

पालघर: जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात एफ डी आर घोटाळा गाजत असतानाच याचाच थेट संबंध असलेला कागदपत्रे गहाळ झालेले प्रकरण देखील आता चांगलेच चर्चेत आले आहे. कारण की वरिष्ठ लिपिकाच्या टेबलवरून एक महत्त्वाची फाईल गहाळ झाल्याची तक्रार जव्हार पोलिसांमध्ये करण्यात आली होती.

हा चोर पकडण्या अगोदरच सदरची फाईल अगदी सुट्टीच्या दिवशी करण्यात परत आल्याचे सांगण्यात येत आहे. गहाळ झालेली फाईल तर आली. मात्र त्यातली कागदपत्रे बदलण्याची तक्रार पुन्हा त्यात वरिष्ठ लिपिकांनी जव्हार पोलिसात केली आहे.

Jawhar PWD File Case
Mumbai Mayor Office Bomb Threat: मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

यामुळे हा कागदपत्र चोर पकडण्याचे मोठे आव्हान आता जव्हार पोलिसांसमोर उभे राहिले आहे. मुळात कागदपत्रे चोरी जाण्याच्या अगोदर या कार्यालयात काही एफडीआर हे बोगस असल्याच्या संशयावरून माहिती मागविण्यात आली होती.

यामुळे हीच माहिती दडविण्यासाठी नेमकी तीच फाईल चोरली गेली का आणि चोरून पुन्हा त्यातील एफडीआर बदलले तर नाही ना असा संशय आता या कागदपत्रांच्या चोरीमुळे वाढला आहे.

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या काही महिन्यात कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार समोर आले आहेत. यावर तात्काळ पोलिसात गुन्हे दाखल होऊ नये आरोपीवर कारवाई देखील झाली मात्र सध्या चर्चेत असलेल्या एफडीआर प्रकरणात अद्याप पर्यंत कोणतीही तक्रार पोलिसात झालेली नसून कार्यालयीन चौकशी देखील चालू आहे किंवा नाही याबाबत तेथील अधिकारी उत्तर देत नाही.

मात्र या प्रकरणाचा चौकशी होऊन पोलिसांपर्यंत जाईल की नाही याबाबत साशंकता असतानाच किमान कागदपत्र चोरणाऱ्या आरोपीला तरी पोलीस जेरबंद करतील की नाही हा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

मुळात 111 कोटी रुपयांची अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न असेल की खोटी कागदपत्रे जोडून 73 लाखांचा अपहार असेल ही प्रकरण अद्याप पर्यंत ताजी आहेत त्याचा तपास देखील सुरू आहे.

Jawhar PWD File Case
Kalyan Crime News: झुंझाराव मार्केटमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १५ तरुणींसह १७ जणांना बेड्या

एफडीआर प्रकरणाची अद्यापपर्यंत कसलीही तक्रार नाही

सध्या जव्हार बांधकाम विभागात एफडीआर बोगस असल्याच्या संशयावरून मोठे रणकंदन माजले आहे आणि हेच प्रकरण लपविण्यासाठी कागदपत्र चोरीला गेल्याचा देखील प्राथमिक अंदाज आहे.

मात्र हे प्रकरण फक्त चोरीपुरतं मर्यादित नसून संशय असलेल्या एफ डी आर पेक्षा 2015 पासून आजतायगत जर सर्वच एफडीआर तपासले तर हा घोटाळा शेकडो कोटींमध्ये जाण्याची शक्यता असल्याचे या संबंधीचे जाणकारांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news