Palghar PWD : ठेकेदारांना द्यायला निधी नाही, सुशोभीकरणावर मात्र लाखोंचा खर्च

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत जव्हार आणि मोखाडा कार्यालयावर निधीची उधळण
Palghar PWD Corruption Allegations
Palghar PWD Corruption Allegationspudhari photo
Published on: 
Updated on: 

पालघर : सध्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागांमधील अनेक भ्रष्टाचार गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहेत. यातील 111 कोटींचा घोटाळा असेल की 73 लाखांचा अपहार. या नंतर सध्या येथील एफडीआर घोटाळा आणि चोरीला गेलेली कागदपत्रे हे प्रकरण देखील ताजी असतानाच बदनामीच्या गर्तेत सापडलेल्या या कार्यालयाकडून काम केलेल्या अनेक कामांना अद्याप निधी उपलब्ध झालेला नसताना सध्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यालय अंतर्गत फर्निचर लावण्याचे काम जोरात सुरू आहे. तर याच कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मोखाडा उपविभाग कडून देखील कमानी सजविण्याचे काम सुरू आहे.

यामुळे एकीकडे दररोज भ्रष्टाचाराची प्रकरणे निघत आहेत. दुसरीकडे ठेकेदारांनी केलेल्या कामांना पैसे नाहीत असे असतानाही या कार्यालयाकडून मात्र कार्यालय सजावटीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुळात या कार्यालयातील कार्यभार सुधारणा करणे आवश्यक असताना ते सोडून कार्यालयांवर मात्र कोट्यवधींचा खर्च करणे योग्य आहे का असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

Palghar PWD Corruption Allegations
Palghar Chemical Park : वाढवण बंदराशेजारी ५,००० एकरांपर्यंत रासायनिक पार्क

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील एफडीआर बोगस असल्याचा संशय व्यक्त होत असून यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर येथील दप्तरच चोरीला गेल्याची तक्रार जवाहर पोलिसात दाखल करण्यात आली. यासंबंधी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला आहे. जव्हार पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत. मुळात एकीकडे कोट्यवधी रुपयांची कामे आदिवासी विकास विभाग अंतर्गत करण्यात आल्यानंतर याचा निधी देण्यात आलेला नाही.

यासाठी ठेकेदार दररोज या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत तर दुसरीकडे मात्र कोटींचे घोटाळे संबंधित आरोपी आणि कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आणि होत असल्याचा आरोप आहे. अशा स्थितीत आज घडीला जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात या अधिकाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कॅबिन बनविण्याचे काम जोरात सुरू आहे.

यासाठी या फर्निचरवर पुन्हा लाखो रुपयांचा खर्च होणार आहे, तर याच कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मोखाडा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या आवारात घुसण्यासाठी एका सुसज्य कमानीचे काम सुरू आहे. यासाठी देखील लाखोंचा खर्च होणार आहे यामुळे एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे दुसरीकडे केलेल्या कामांना निधी नाही आणि तिसरीकडे या कार्यालयाच्या सुशोभीकरणावर मात्र लाखोंचा खर्च असे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे.

Palghar PWD Corruption Allegations
Netivali Hill Historical Project : कल्याणच्या नेतिवली टेकडीवर साकारणार शिवरायांच्या आरमाराचा इतिहास

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात 111 कोटींचा घोटाळा झाल्यानंतर या आधी देखील अनेकदा या कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. यामुळे तत्कालीन अधीक्षक अभियंता यांनी हे कार्यालयात जव्हार येथून थेट पालघरला हलविण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या होत्या. या संदर्भातची चर्चा आज देखील होत आहे. यामुळे अशीच भ्रष्टाचाराची प्रकरणे निघत राहतील तर हे कार्यालय थेट पालघरला देखील हलविण्यात येईल अशी शंका व्यक्त होत असताना या कार्यालयाच्या सुशोभीकरणावर लाखो रुपये खर्च करणे योग्य आहे का असा देखील सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news