Jawhar fake cheque case : जव्हारमधील 111 कोटी बनावट धनादेश प्रकरण

आरोपींना पोलीस कोठडी
Fake cheque|
जव्हारमधील 111 कोटी बनावट धनादेश प्रकरण File Photo
Published on
Updated on

जव्हार ः जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने तब्बल 111 कोटी रुपयांचा बनावट धनादेश वटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी न्यायालयात हजर झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जव्हार यांनी 29 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या प्रकरणात 28 नोव्हेंबर 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार कार्यालयाच्या धनादेश क्रमांक 069218 वर लेखा अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्या बनावट सह्या करून रुपये 111 कोटी 63 लाख 31 हजार 810 इतकी रक्कम ओवी कन्स्ट्रक्शन यांना डिमांड ड्राफ्टद्वारे अदा करण्यासाठी धनादेश तयार करण्यात आला होता. हा धनादेश आरोपी यज्ञेश दिनकर अंभिरे याने स्टेट बँक ऑफ इंडिया, जव्हार शाखेत वटविण्यासाठी जमा केला होता. मात्र तो धनादेश वटला नाही. त्यानंतर ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक निलेश रमेश पडवळे यांनी तो धनादेश वटविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

Fake cheque|
Palghar News : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शुद्ध पाण्याची वानवा

सदर धनादेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वितरितच करण्यात आला नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी निलेश रमेश पडवळे व यज्ञेश दिनकर अंभिरे यांनी आपसात संगनमत करून शासनाची आर्थिक फसवणूक करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानुसार 28 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना सुरुवातीला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर वाढीव पोलीस कोठडी मंजूर न झाल्याने आरोपी न्यायालयीन कोठडीत गेले व पुढे जामिनावर मुक्त झाले. मात्र गुन्ह्याचा तपास अपूर्ण असल्याने आरोपी पोलीस कोठडीत असणे आवश्यक असल्याचे नमूद करून आर्थिक गुन्हे शाखा, पालघर यांनी भिवंडी येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन अपील दाखल केले.

Fake cheque|
Palghar News : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शुद्ध पाण्याची वानवा

अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने हे अपील मान्य करून आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते.22 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने भिवंडी न्यायालयाचा आदेश कायम ठेवत आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जव्हार यांच्या न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news