Boisar News: बोईसर-चिल्हार मार्गावर अवजड टाकी ट्रकमधून कोसळली; एमआयडीसीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
Boisar News
Boisar NewsPudhari
Published on
Updated on

बोईसर: बोईसर-चिल्हार मार्गावरील गुंदले परिसरात रविवारी सकाळी मोठ्या आकाराची औद्योगिक टाकी वाहून नेणाऱ्या ट्रकमधून अचानक रस्त्यावर कोसळल्याने बोईसर-तारापूर एमआयडीसीकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अवजड टाकी घेऊन जाणारा ट्रक गुंदले परिसरातून जात असताना टाकीचा तोल जाऊन ती ट्रकवरून खाली पडली.

Boisar News
Sabudana Demand: आषाढी एकादशीला राज्यात ८०० टन साबुदाण्याची विक्री

त्यामुळे ट्रकही रस्त्याच्या मधोमध अडकला आणि एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील वाहतूक खोळंबली. या मार्गावरून दररोज हजारो कर्मचारी, मालवाहू वाहने आणि औद्योगिक कंपन्यांची वाहतूक होत असल्याने काही वेळातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

घटनेची माहिती मिळताच कुणबी सेनेचे अविनाश पाटील यांनी तत्काळ वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी व्हटकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तत्परतेने एका बाजूने वाहतूक वळवून वाहने सुरळीत सुरू ठेवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या तातडीच्या आणि नियोजनबद्ध कार्यवाहीमुळे मोठी वाहतूक कोंडी टळली असून प्रवाशांनी वाहतूक पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. दरम्यान, बोईसर-चिल्हार हा मार्ग आधीच अवजड वाहनांची मोठी वर्दळ, अरुंद जागा आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत असतो.

अशा प्रकारच्या अवजड यंत्रसामग्री किंवा टाक्यांची वाहतूक करताना सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, योग्य बांधणी करणे आणि आवश्यक ती पोलीस परवानगी व मार्गदर्शन घेणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Boisar News
Student Protest: मुंबईतील १६ एफआयआरचे काय? कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांचे सरकारकडे लक्ष

या घटनेमुळे पुन्हा एकदा बोईसर-तारापूर औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाहनचालक आणि नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news