Palghar News : घर उभे राहण्यासाठी घरकुल लाभार्थ्याने थापल्या विटा

घरकुल प्रतीक्षार्थी अशोक लाखातची कहाणी
Rural housing scheme
घर उभे राहण्यासाठी घरकुल लाभार्थ्याने थापल्या विटा pudhari photo
Published on
Updated on

वाडा : मच्छिंद्र आगिवले

गोरगरीबांच्या डोक्यावर हक्काचे पक्के छत असावे या उद्देशाने सरकार विविध योजनांमार्फत घरकुल योजना लाभार्थ्यांना देते. वाडा तालुक्यात जवळ्पास 10 हजार लोकांना छत सरकारने मागील वर्षी दिले ,मात्र यातील अनेक घरे आजही अपूर्ण असून लाभार्थी घरांच्या पूर्ततेसाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत.

दहिवली गावातील एका व्यक्तीने घरचा लाभ मिळाला तर त्यात कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशाने स्वतः विटा थापल्या आहेत. वीस हजार विटा सध्या भट्टीत पक्क्या होत असून परिस्थिती कधीही असली तरी लाभार्थ्याचे प्रयत्नही खूप पक्के आहेत हेच यातून स्पष्ट होत आहे.

Rural housing scheme
Thane bogus doctors : ठाण्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; प्रभागनिहाय नेमणार शोध पथके

घरकुल उभारणीसाठी सरकार लाभार्थ्याला 1 लाख 20 हजारांचा लाभ देत असून कातकरी समाजासाठी 2 लाखांचा निधी दिला जातो. बहुतांश लाभार्थ्यांच्या मते सरकारचा हा निधी तोकडा असून घर उभारताना अनेक लाभार्थी कर्जबाजारी होतात. कित्येकांनी विटा परवडत नाहीत म्हणून सिमेंटच्या विटा वापरायला सुरुवात केली आहे.

घरकुल योजना जशा मंजूर झाल्या तसे विटांचे दर पण गगनाला भिडले असून लाभार्थ्यांचे मात्र यात कंबरडे मोडले आहे. दहिवली ( कुंभिस्ते ) गावातील अशोक लाखात यांनी मात्र घराच्या उभारणीत कोणतीही बाधा उभी राहू नये यासाठी आधीच उपाययोजना केली आहे.

Rural housing scheme
Raigad News : उसर-पोयनाड मार्गाच्या कामाला अखेर वेग

अशोक हे खरेतर शेतकरी व उन्हाळ्यात मजुरकर म्हणून काम करतात मात्र त्यांनी घरकुल मंजूर झाल्यावर विटांचा बंदोबस्त व्हावा व त्यासाठी निधीची अडचण येऊ नये यासाठी स्वतः हाताने विटा थापायला सुरुवात केली आहे. 20 हजार विटा तयार झाल्या असून यासाठी त्यांना 40 हजारांचा खर्च आला आहे. अशोक यांच्या पत्नीने यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.

अशी बनते विट :

दुपारी विशिष्ट पद्धतीची माती, भाताचा तुस, राख असे मिश्रण खड्ड्यात रात्रभर भिजत ठेवायचे, सकाळी भिजलेली माती बाहेर काढून ती काहीकाळ सुकवायची, बनवून आणलेल्या साच्यातून विटांची निर्मिती करायची, सुकवलेल्या विटा उभ्या रचून ठेवायच्या व घरीच कोळसा आणून भट्टीत विटा भाजून तयार होतात.

घरकुल यादीत नाव असल्याने पुढील वर्षी घर मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र त्यावेळी विटा खरेदीसाठी अडचण नको म्हणून हा प्रयत्न मी करीत आहे. घरकुल लाभार्थ्यांची खरेतर घर उभारताना होणारी दमछाक आम्ही बघितली असून आपल्यावर घरकुल अर्धवट ठेवण्याची वेळ नको यासाठी आमचा हा अट्टाहास सुरू आहे.

अशोक लाखात, घरकुल प्रतिक्षा लाभार्थी, दहिवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news