Female Russell’s viper : घरात आढळली अंड्यासह डुरक्या घोणस सापाची मादी

मागील काही दिवसांपासून घोणस जातीच्या सापाचे वास्तव्य
Female Russell’s viper
घरात आढळली अंड्यासह डुरक्या घोणस सापाची मादीpudhari photo
Published on
Updated on

वसई : वसईतील अर्नाळा येथे एका घरात सोमवारी घोणस जातीच्या मादी सापासह आठ अंडी सापडली. घोणस ही महाराष्ट्रातली अत्यंत विषारी सापाची जात समजली जाते. मुख्यत्वे थंडीच्या हंगामात हे साप दिसून येतात. येथील रहिवासी जनार्दन मेहेर यांच्या घर दुरुस्तीचे काम सुरू असताना कोनाड्यात सदर मादी व तिची अंडी आढळून आली.

सर्पमित्र उपलब्ध नसल्यामुळे मेहेर यांनी आवश्यक काळजी घेत सदर सर्प व त्याची अंडी जमा केली व त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली.

Female Russell’s viper
Palghar Crime : बोईसर बस डेपो परिसरात गांजासह महिलेला अटक

मागील काही दिवसांपासून घोणस जातीच्या सापाचे वास्तव्य आढळून येत आहे. अनेकदा अजगर समजून या सापांना स्पर्श केल्यानंतर दंश केल्यामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Female Russell’s viper
Thane News : दात काढले, दृष्टी कमी झाली ? ही केवळ अफवा...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news