Palghar Hospital: पालघरमध्ये जखमी गोविंदाच्या उपचारावरून शिवसैनिकांचा गोंधळ; रुग्णालयीन कर्मचाऱ्याला मारहाण

१७ जणांविरोधात गुन्हा
Palghar Hospital
Palghar HospitalPudhari
Published on
Updated on

पालघर: पालघर शहरातील दहीहंडीचा उत्साह संपत नाही तोच मध्यरात्री पालघरमध्ये एका रुग्णालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दादागिरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गोविंदा पथकातील जखमी सदस्याच्या उपचारावरून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात घुसून धुडगूस घातला.

तर तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून रुग्णालयाची तोडफोड करण्याची धमकी आणि एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याच्या आरोपांवरून शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, यांच्या सह 17 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी रात्री उशिरापर्यंत शहरात दहीहंडी फोडण्याचे कार्यक्रम सुरू होते. मात्र रात्री उशिरा एका गोविंदा पथकातील गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून वाद झाला. त्या नंतर एका कर्मचार्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Palghar Hospital
Mahavitaran Smart Meter: स्मार्ट मीटरचा मुद्दा वसई-विरारमध्ये चर्चेचा विषय

जिल्हा प्रमुख यांच्यासह शहर प्रमुख राहुल घरत आमदार राजेंद्र गावितांचे चिरंजीव रोहित गावीत, नीलम संखे, मनोज घरत अश्या 17 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या गोंधळाचे प्रकरण कैद झाले आहे.

पालघर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या कार्यालय जवळ दहीहंडी उत्सवाचे आयोजन सुरू होते. शनिवार रात्री व दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

गोविंदा पथकातील सदस्य थर लावताना जखमी झाल्यानंतर पाच जणांना उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका रुग्णाच्या डोक्याला व मणक्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी सीटी स्कॅनसह पुढील उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. उपचाराचे शुल्क सुमारे २० हजार रुपये असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.

त्यापैकी १० हजार रुपये आयोजकांकडून जमा करण्यात आले. मात्र रुग्णाला सोडण्यावरून आणि सीटी स्कॅनच्या आवश्यकतेवरून वादाला सुरुवात झाली. यानंतर कुंदन संखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि समर्थक रुग्णालयात दाखल झाले.

Palghar Hospital
Kalyan Missing Girl Found: गावी जाण्याच्या ओढीने १२ वर्षीय मुलीने सोडले घर; मानपाडा, लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

‘सीटी स्कॅन कशासाठी?’ अशी विचारणा करण्यात आली. वैद्यकीय कारणास्तव तपासणी आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर वातावरण अधिकच तापल्याचे चित्रीकरणात दिसत आहे. पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत शिवीगाळ केल्याचे रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या गोंधळादरम्यान शहरप्रमुख राहुल घरत यांनी एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत त्याच्या कानशिलात लगावल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. रुग्णालयाची तोडफोड करण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात प्रवेश करून तेथील रुग्णांना सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे. त्यामुळे उपचारासाठी दाखल असलेल्या इतर रुग्णांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news