Palghar News : पालघर जिल्ह्याला मिळणार पाच वसतिगृहे

डहाणू,मोखाडा,पालघर,जव्हार आणि वसईचा समावेश
Residential Hostels for Tribal Students
Residential Hostels for Tribal Studentspudhari photo
Published on: 
Updated on: 

पालघर : हनीफ शेख

केंद्र सरकारच्या धरती आबा जनजाती ग्राम उत्कृष्ट अभियान अंतर्गत गावांमधील आदिवासी लोकसंख्येचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी विविध योजना हाती घेण्यात आलेले आहेत. यानुसार सदर अभियानांतर्गत केंद्र शासनाने वस्तीगृह बांधण्यासाठी 22 जिल्हे निश्चित केली आहे. त्यानुसार सहा जिल्ह्यातील 11 तालुक्यात नव्याने वस्तीगृह बांधण्यात येणार आहेत सदर 11 ब्लॉक मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या परिसरात वस्तीगृह बांधकामासाठी जागा उपलब्ध असल्याचे जिल्हा परिषदे कडून कळविल्यानंतर या वस्तीगृह बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे.

यानुसार डहाणू तालुक्यातील जि प शाळा सरावली मोखाडा तालुक्यातील जि प केंद्र शाळा मोखाडा पालघर मधील जि प शाळा सावरे जव्हार तालुक्यातील जिप शाळा चौक आणि वसई तालुक्यातील कामं अशा पाच ठिकाणी ह्या वस्तीगृह बांधणीला सुरुवात झाल्याचे एकूणच चित्र आहे.

Residential Hostels for Tribal Students
Mahikawati Devi Temple Mahad : महिकावती देवीच्या चरणी इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम

सुरुवातीला या वस्तीगृहांच्या जागेसाठी शोधाशोध करावी लागली होती मात्र जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात जागा उपलब्ध झाल्याने या वस्तीगृहाचे काम हाती घेण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. मुळात ज्या शाळांच्या नावांनी हे वसतिगृह इमारत मंजूर झाली आहे त्या शाळांच्या परिसरात जागा मिळणे कठीण असल्याने त्याच्या आजूबाजूला सरकारी जागेत हे वस्तीगृह बांधण्यात येणार आहेत.

या वस्तीगृहामध्ये प्राथमिक माहितीनुसार केंद्र शाळेतील मुलं मुली देखील राहू शकतील असे सांगण्यात येत आहे तर अनेकदा आदिवासी दुर्गम भागात राहण्याची सोय नसल्याने अनेक मुले मुली शाळाबाह्य राहत असल्याचे देखील दिसून आले आहे यामुळे अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी हे वस्तीगृह एक पर्वणी ठरणार आहे. सदरची योजना ही केंद्र सरकारची असल्यामुळे यावर अंकुश देखील केंद्र सरकारचे असणार आहेत मात्र वस्तीगृह बांधणे आणि यातील प्रवेश ह्या बाबी जिल्हा परिषद कशाप्रकारे हाताळणार हेही पाहणे गरजेचे ठरणार आहे.

सध्या एकात्मिक विकास प्रकल्प अंतर्गत अनेक निवासी आश्रम शाळा आहेत याचबरोबर अनुदानित आक्रमण झाला देखील या भागात आहेत याशिवाय सरकारी वस्तीगृह देखील सुरू आहेत तर काही संस्थांमार्फत देखील अनुदानित वस्तीगृह चालविले जातात असे असतानाही पुन्हा या वस्तीगृहासाठी विद्यार्थी प्रवेशांचा काय निकष असणार आहे.

Residential Hostels for Tribal Students
Yunus Shaikh Shiv Sena Appointment : सहर शेख यांच्या वडिलांना शिंदेंच्या शिवसेनेचे पद

याबाबत अधिकृत माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली नसली तरी केवळ योजना राबवायची म्हणून वस्तीगृह बांधणे या बाबीला तिलांजली देऊन खऱ्या अर्थाने येथे मुलांचा शैक्षणिक मानसिक शारीरिक विकास होणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. कारण की आज अनेक वस्तीगृहांची परिस्थिती पाहता येथील परिस्थिती अतिशय दयनी आहे. यामुळे केवळ योजना राबवायची म्हणून पैसे खर्च न करता ती योजना चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावी ह्या पद्धतीने काम होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news