Dahanu folk history museum: घोलवडच्या लोक इतिहास संग्रहालयाला गुगल आर्ट अँड स्टोरीमध्ये स्थान

एमटीडीसीच्या उपक्रमातून उभे राहिले महाराष्ट्रातील पहिले लोक इतिहास संग्रहालय
Dahanu folk history museum
Dahanu folk history museumPudhari
Published on
Updated on

डहाणू: जागतिक संग्रहालय दिनानिमित्त डहाणू तालुक्यातील घोलवड येथील लोक इतिहास संग्रहालयाला गुगल आर्ट अँड स्टोरी या व्यासपीठावर स्थान मिळाले असून ही डहाणू परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या माध्यमातून घोलवड येथील संग्रहालयाचा इतिहास, आदिवासी संस्कृतीचा वारसा आणि पारंपारिक जीवनशैली आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. विशेष म्हणजे या संग्रहालयाची नोंद कायमस्वरूपी गुगलच्या इतिहासात राहणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी पारंपारिक सांस्कृतिक पर्यटन विकासाच्या उद्देशाने हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. घोलवड येथील ऐतिहासिक मराठी शाळेच्या शंभर वर्षांहून अधिक जुन्या इमारतीत हे संग्रहालय सुरू करण्यात आले असून येथे आदिवासी समाजाच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू जतन करण्यात आल्या आहेत.

Dahanu folk history museum
Raigad Tourism Decline: किल्ले रायगडावर उन्हाच्या तडाख्याने पर्यटकांची घट

संग्रहालयात विविध पारंपारिक मुखवटे, वारली चित्रकलेतील लग्न चौक, तारपा, घांगली यांसारखी पारंपारिक वाद्ये तसेच अन्य सांस्कृतिक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.या संग्रहालयासाठी घोलवड आणि बोर्डी परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आदिवासी संस्कृतीशी संबंधित वस्तू दान केल्या आहेत.

स्थानिक लोकांच्या सहभागातून उभे राहिलेले हे महाराष्ट्रातील पहिले कम्युनिटी म्युझियम मानले जात असून या उपक्रमात नागरिकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. संग्रहालयाला भेट देणाऱ्यांमध्ये कोकण विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाचे सचिव, डहाणूचे प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच मुंबई येथील आयकर विभागाचे आयुक्त यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

Dahanu folk history museum
Summer heatwave: तीव्र उन्हाळ्यामुळे मुलांच्या मैदानी खेळांवर परिणाम; मे महिन्यातील सुट्टीच्या आनंदाला ब्रेक

सरपंच रविंद्र बुजड आणि उपसरपंच कुणाल शाह यांनी याबाबत माहिती दिली. या संग्रहालयाचे उद्घाटन 20 फेब्रुवारी रोजी आयोजित मातीच्या रंगाचे संमेलन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पद्मश्री तारपा वादक भीकल्या धिंडा यांच्या हस्ते करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news