Summer heatwave: तीव्र उन्हाळ्यामुळे मुलांच्या मैदानी खेळांवर परिणाम; मे महिन्यातील सुट्टीच्या आनंदाला ब्रेक

वडीलधाऱ्यांकडून घरात राहण्याचे सल्ले
Summer heatwave
Summer heatwavePudhari
Published on
Updated on

पोलादपूर: वाढत्या गरमी सह तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत त्यातच वाढत्या इंधन दर व महागाईचे दर लक्षात घेता प्रवास महागला कडक उन्हात बच्चेकंपनी घरात अडकून पडली असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे.

बच्चेकंपनी घरातील साप सीडी, कॅरम पत्ते सारखे खेळ खेळत आहे त्यातच मामाचे गाव सुद्धा बदलत्या काळानुसार बदल झाले आहेत. मामाच्या गावातील घराचे अंगण हरवले आहेत कौलारू घराची जागा दुमजली ईमारतने घेतली आहे असे असले तरी मामाकडे काही दिवसांसाठी बच्चेकंपनी येत असली तरी रानमेवा सारख्या फळापासून दूर होत आहे.

Summer heatwave
Khopoli drain cleaning issue: खोपोली नगरपालिकेची नालेसफाई कधी होणार? नागरिकांचा सवाल

उन्हाळ्यातील सुट्टीवर कडक उन्हात गंडांतर आल्याने लहान मुले हिरमुसली आहेत. उन्हात बाहेर फिरू नये असे सांगत वडीलधाऱ्या मंडळींकडून घराबाहेर पडू नये, यासाठी दरडावण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या गावातही सवंगड्यांसह मौजमजा करण्यावर निर्बंध आले आहेत. त्यातच वाढती उष्णता, वाढते वणव्याचे प्रकार, वातावरणात बदल होत असल्याने तसेच रानावनात अनेक झाडे झुडपे ची झालेली तोड लक्षात घेता बच्चेकंपनीचा कल तंत्रज्ञानच्या युगात बदलले दिसून येत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची क्रेझ आजही टिकून आहे. सकाळी नदीवरील अंघोळ, सायंकाळी रानात फेरफटका सह इतर खेळात बच्चेकंपनी मग्न झाली आहे. ग्रामीण भागातील बच्चेकंपनी अंगणात किंवा माजघरात विविध खेळ खेळत असतील मात्र सिमेंटच्या इमारतीमध्ये चारभीतींच्या आत वावरणाऱ्या बच्चेकंपनीला मात्र चार भीतींच्या आड बसावे लागते आहे.

Summer heatwave
Kharghar theft case recovery: 94 लाखांचा चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द; नऊजणांना अटक

कडक उन्हाच्या काहिलीने सर्व सामान्य नागरिकसह बच्चेकंपनी त्रस्त होत आहेत, त्यामुळे दुपारचे खेळणे, रानात फिरणेपासून ते लांब रहात असल्याने रानातील रानमेवा पासून सुद्धा या गरमीमुळे मुकत आहेत. गेल्या उन्हाच्या काहिलीने सर्वसामान्य जनतेसह पक्षी हैराण झाले आहेत.

नव्याने वृक्षलागवडीची आवश्यकता

नदीनाल्यांनी तळ गाठला असून विहिरीसुद्धा तळाला गेल्या आहेत. तीव्र उन्हामुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट पाहवयास मिळत आहेत. गार हवेसाठी वातानुकूलित सारख्याना प्राधान्य दिले जात आहे. कारण वाढत्या वृक्षतोडीमुळेे सर्वसामान्य नागरिकांना ग्रामस्थांना नैसर्गिक हवेपासून वंचित राहावे लागत आहे. नव्याने वृक्ष लागवड व त्याची जोपासना करावी लागणार आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल अन्यथा भीषण उष्माघाताला सामोरे जावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news