Dabhosa Waterfall Skywalk: दाभोसा 'स्काय वॉक' १५ ऑगस्टला होणार खुला?

अधिकृत उद्घाटनापूर्वी प्रवेशास सक्त मनाई, पर्यटकांमध्ये नाराजी
Dabhosa Waterfall Skywalk
Dabhosa Waterfall SkywalkPudhari
Published on
Updated on

पालघर: पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दाभोसा वॉटर फॉल येथील स्काय वॉक पुलाचे 15 ऑगस्ट 2026 रोजी उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन ०६ ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले होते.

या बैठकीत स्काय वॉकच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून अधिकृत उद्घाटनापूर्वी कोणालाही प्रवेश न देण्याचे कडक निर्देश नाईक यांनी दिले. मुळात हा स्काय वॉक तयार करून बरेच महिने झाल्यानंतर याची समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी झाली.

यामुळे अनेक पर्यटक दाभोसा धबधबा पाहण्याबरोबरच या स्काय वॉकचा आनंद घेण्यासाठी देखील येत होते मात्र हा स्काय वॉक बंद असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता याबाबत काही तांत्रिक बाबी पूर्तता करणे बाकी असल्याचे ढोबळ उत्तर संबंधित विभागाकडून देण्यात येत होते. मात्र आता याचे अधिकृत उद्घाटन होवून १५ ऑगस्ट रोजी हा स्काय वॉक सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Dabhosa Waterfall Skywalk
Third Mumbai Development: तिसऱ्या मुंबईच्या विकासाला मिळणार गती; नवे प्रकल्प दृष्‍टीपथात

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावेळी या बाबींवर चर्चा झाली यामध्ये अपघात घडण्याची वाट न पाहता, अपघात टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी.पर्यटकांची सुरक्षितता व इतर सोयी सुविधा विचारात घेऊन वाहनतळ (पार्किंग), लेन मार्किंग, आणि गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करावे.

सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून 15 ऑगस्ट रोजी स्काय वॉकचे उद्घाटन निर्विघ्नपणे पार पाडावे. याशिवाय वन विभागाने या पर्यटन स्थळावर सक्रिय सहभाग घेऊन इतर पायाभूत सुविधा पुरवाव्यात यासाठी नियमित तपासणी व आवश्यकतेनुसार वनरक्षकांची नियुक्ती करावी.

अशा सूचना देण्यात आल्या असून पर्यटकांची सुरक्षितता व इतर तांत्रिक बाबी तपासून 15 ऑगस्ट रोजी स्काय वॉक पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला (जव्हार) देण्यात आले आहेत.

यावेळी स्काय वॉकवर एकावेळी क्षमतेनुसार किती पर्यटकांना प्रवेश द्यावा, त्याचा कालावधी आणि प्रवेश शुल्क याबाबतचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Dabhosa Waterfall Skywalk
Thane News: आरोग्य कर्मचारी घेणार गावोगावी संशयित रुग्णांचा शोध; लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणीचा सल्ला

तसेच उद्घाटनापूर्वी काही नागरिकांना स्काय वॉकवर प्रवेश दिल्याचे निदर्शनास आल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकृत उद्घाटनापर्यंत कोणालाही प्रवेश देऊ नये, अन्यथा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद व्हीआयपींसाठी खुला?

जव्हार येथील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर बहुचर्चित स्काय वॉक बांधण्यात आला. याची सुरवीतला जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी झाली यानंतर तो लवकरच चालू होईल अशी अटकळ बांधण्यात येत होती.

यानंतर विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी २९ जुलै रोजी हा स्काय वॉक सुरू होणार असेही सांगितले होते मात्र आता अधिकृत रित्या १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले आहे.

मात्र आजवर अनेकांनी या स्काय वॉक वरील आपले फोटो व्हिडिओ समाजामध्यांवर शेअर केले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुळात आजवर एकीकडे सर्वसामान्यांना बंद असलेला स्काय वॉक vip किंवा काही खास व्यक्तीसाठीच खुला होता काय असाही सवाल आता उपस्थित होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news