Dabhosa Glass Skywalk | दाभोसा ग्लास स्कायवॉकमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना

Dabhosa Glass Skywalk | स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार; पालकमंत्री गणेश नाईक यांचे प्रतिपादन
Glass Skywalk
Glass SkywalkPudhari
Published on
Updated on

पालघर : पुढारी वृत्तसेवा
दाभोसा हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असून या ग्लास स्कायवॉकमुळे या पर्यटन स्थळाकडे देशातील तसेच परदेशातील पर्यटकांचा ओघ वाढणार असून याद्वारे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध दाभोसा धबधबा पर्यटनस्थळी उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचे लोकार्पण उत्साहात करण्यात आले.

Glass Skywalk
Yatish Deshmukh Palghar SP | पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना मानाचे शौर्य पदक

पालघर जिल्ह्याचे भौगोलिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्य लक्षात घेता आगामी काळात जिल्ह्याला देशाच्या पर्यटन आणि आर्थिक नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळेल, असे सांगताना पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की, पालघरची मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता यांसह देशातील विविध भागांशी कनेक्टिव्हिटी वेगाने वाढत आहे.

विमानतळ, बुलेट ट्रेन आणि विविध महामार्गांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पालघरला समुद्रकिनारा आणि डोंगराळ, निसर्गसमृद्ध भाग अशी दुहेरी नैसर्गिक देणगी लाभली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक समुद्रकिनारा आणि पर्यटनस्थळ विकसित करण्याचा सरकारचा मानस असून, पर्यटनातून स्थानिकांना रोजगार आणि उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यटकांना स्थानिक आदिवासी कुटुंबांच्या घरांमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 'होम-स्टे' संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणाऱ्या मदतीबरोबरच पर्यटक निवासासाठी आवश्यक अतिरिक्त सुविधा उभारण्यासाठी कर्ज किंवा अन्य आर्थिक साहाय्याची व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे पर्यटनाचा थेट आर्थिक फायदा स्थानिक आदिवासी कुटुंबांना मिळेल आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

Glass Skywalk
Palghar Dangerous Buildings: भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर पालघर न.प.ची कारवाई; १०९ धोकादायक इमारतींना नोटिसा

दाभोसा स्कायवॉकवर पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सीसीटीव्ही यंत्रणा स्थानिक पोलिस ठाण्यांशी जोडण्याच्या तसेच प्रवेशद्वारावरील नियंत्रण अधिक सक्षम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या प्रसंगी खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासूर उपवनसंरक्षक सैफुन शेख, यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, आदी उपस्थित होते.

दाभोसासह जव्हारमधील पर्यटनस्थळांचा विकास

  • एकात्मिक विकास आराखडा: दाभोसा येथील ग्लास स्कायवॉक हे केवळ सुरुवात असून जव्हार तालुक्यातील इतर पर्यटनस्थळांवरही आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

  • सुविधा व महसूल वाटप: स्कायवॉक परिसरात पार्किंग, पर्यटक सुविधा आणि इतर आवश्यक सोयी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. या पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा ग्रामपंचायतीला मिळावा, तसेच पार्किंग व्यवस्थेतूनही स्थानिक संस्थांना आर्थिक लाभ मिळावा, अशी भूमिका पालकमंत्री गणेश नाईक यांनी मांडली.

  • महिला सक्षमीकरण: महिला बचतगटांना पर्यटनाशी जोडून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news