Chandika Mata Chaitra Yatra: चंडिका देवीच्या जत्रोत्सवास प्रारंभ; रविवारी भव्य पालखी उत्सव!

सोमवारी 6 एप्रिल रोजी पोहा कुस्त्यांचे सामने असा तीन दिवसीय यात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे.
Chandika Mata Chaitra Yatra
Chandika Mata Chaitra YatraPudhari
Published on
Updated on

वसई: महाराष्ट्रातील लाखो भाविकांची कुलस्वामिनी असलेली पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या पूर्वपट्टीतील जुचंद्र गावच्या गिरीशिखरावर वसलेली आदिशक्ती श्री चंडिका मातेचा चैत्र यात्रा उत्सवास आज पासून सुरुवात झाली आहे. आजच्या पहिल्या दिवशी श्री चंडिका मातेला अभिषेक घालण्यात आला.

रविवार 5 एप्रिल रोजी चैत्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भव्य पालखी उत्सव, गावात होणारा पारंपरिक नाट्यप्रयोग आणि या यात्रेचे खास वैशिष्ट्ये असलेल्या रांगोळी प्रदर्शनास सुरुवात होईल. तसेच सोमवारी 6 एप्रिल रोजी पोहा कुस्त्यांचे सामने असा तीन दिवसीय यात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Chandika Mata Chaitra Yatra
Dahisar Kashigaon metro: दहिसर ते काशिगाव मेट्रोचा मुहूर्त ठरला

श्री चंडिका मातेचे मंदिर हे पांडवकालीन आहे, मातेचे ख्याती मातेचा महिमा हा अगद आहे नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी चंडिका मातेचा चैत्र यात्रा उत्सव प्रति वर्षाप्रमाणेच याही वर्षी संपन्न करण्यासाठी मंदिराच्या ग्रामदेवी न्यास जुचंद्र या विश्वस्त कमिटीने नुकतेच मंदिराचे सल्लागार सेक्रेटरी यांची मीटिंग घेऊन यात्रास्तवाच्या कामाचा आढावा घेतला. यात मंदिर स्वच्छता, रंगरंगोटी, यात्रोस्तवात तीन दिवस दर्शन व्यवस्था, आदीबाबतचे पूर्वनियोजन करण्याची तयारी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news