Bullet train project : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

डहाणूतील साखरेत बसवले फुल स्पॅन बॉक्स गर्डर
Bullet train project
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर pudhari photo
Published on
Updated on

पालघर ः मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात बुलेट ट्रेन मार्गात महाराष्ट्रात प्रथमच पालघर जिल्ह्यातील साखरे येथे फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड काँक्रिट (PSC) बॉक्स गर्डर बसवण्यात आला आहे. फुल स्पॅन लॉन्चिंग गॅन्ट्रीच्या (FSLG) सहाय्याने 40 मीटर लांबीचा फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड काँक्रिट (PSC) बॉक्स गर्डर बसवण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघर जिल्ह्यात देखील प्रगती पथावर आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील साखरे येथे बुलेट ट्रेनच्या मार्गात 40 मीटर लांबीचा फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड काँक्रिट बॉक्स गर्डर बसविण्यात आला आहे. 40 मीटर लांबीचा फुल स्पेन प्री स्ट्रेट काँक्रीट बॉक्स (PSC) गर्डर सुमारे 970 मेट्रिक टन वजनाचा आहे. हा गर्डर भारताच्या बांधकाम उद्योगातील सर्वात जड मानला जातो.

सदरचे गर्डर एकसंध मोनोलिथिक युनिट कुठलाही कन्स्ट्रक्शन जॉइंट न ठेवता, 390 घनमीटर काँक्रिट आणि 42 मेट्रिक टन स्टील वापरून तयार केले जातात. फुल स्पॅन गर्डरमुळे सेग्मेंटल गार्डरपेक्षा बांधकाम प्रगती वेगाने होते. फुल स्पॅन प्री-कास्ट बॉक्स गार्डरचे प्रक्षेपण स्वदेशी जड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने करण्यात येत असून स्ट्रॅडल कॅरियर्स, ब्रिज लॉन्चिंग गॅन्ट्रीज, गार्डर ट्रान्सपोर्टर्स आणि लॉन्चिंग गॅन्ट्रीज यांचा समावेश आहे.

Bullet train project
Ration e-pos machine problem : रेशनसाठीच्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचण

राज्यात बुलेट ट्रेनचा मार्ग 156 किलोमीटर इतका असून यतील शिळफाटा ते महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील झरळी गावापर्यंत 135 किलोमीटर मार्ग (Elevated -lignment) जमिनीपासून उंचीवर पुलाची रचना करून उभारण्यात येत आहे. उंचीवरील (Elevated -lignment) मार्गातील 103 किमी लांबीचा भाग, सामान्यतः व्हायाडक्ट म्हणून ओळखला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news