Boisar POCSO Case : सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक

पालघर पोलिसांनी आरोपींच्या वर कठोर कारवाई करावी हे मागणी करत आहे.
Boisar POCSO Case
Boisar POCSO CasePudhari
Published on
Updated on

पालघर: डहाणू येथील लव जिहाद प्रकरण ताजे असतानाच बोईसर पोलीस ठाण्यात देखील सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पालघर पोलिसांनी आरोपींच्या वर कठोर कारवाई करावी हे मागणी करत आहे.

बोईसरमध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात आधी आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी संपर्क साधत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवून हिंदू मुलीला फसवल्याची पुन्हा एक घटना उघडकीस आली.

Boisar POCSO Case
Vangaon Bypass Delay: वाणगाव बायपास रखडल्याने जीवघेणी वाहतूक

विशेष म्हणजे बजरंग दलाच्या मदतीने मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पालघर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी तत्काळ दखल घेत आरोपीस पकडण्याच्या सूचना केल्या. बोईसर पोलीस ठाणे प्रभारी यांनी आरोपीस बेड्या ठोकल्याने आरोपी पळून जाऊ शकला नाही.तत्काळ कारवाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

अनेक मुली जिल्ह्यात लव जिहादचे बळी पडत आहेत. ही चिंतेची बाब आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी मुकेश दुबे व चंदन सिंग या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने केले आहे.

Boisar POCSO Case
Nalasopara Child Labour: बालमजुराकडून पॅकिंग मशीनवर काम; १३ वर्षीय मुलाची चार बोटे तुटली

अगोदर केळवे मग डहाणू मग आता बोईसर येथे गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व घटना बजरंग दलाच्या मदतीने बाहेर आल्या. अनेक मुली ह्या लव जिहादचे बळी पडतात ही चिंतेची बाब आहे. दोषी मुलांवर कठोर कारवाई झाल्यास अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल. असे मुकेश दुबे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news