भिवंडी : १९ वर्षीय प्रियकराने १५ वर्षीय प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर जबरी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नारपोली पोलीस ठाणे हद्दीतून समोर आली आहे. याप्रकरणी प्रेयसीच्या फिर्यादीवरून प्रियकरावर नारपोली पोलीस पोक्सोन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. (Bhivandi News )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित प्रेयसी काल्हेर परीसरात राहत असून तिचा प्रियकर त्याच परिसरात राहत आहे. दरम्यान या दोघांमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये जवळीक निर्माण होऊन प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर प्रेमसंबंधातून प्रियकराने प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली असता प्रेयसीने त्यास नकार दिला. त्यानंतर प्रेयसीला आरोपी प्रियकराने त्याच्या घरी बोलावून प्रेयसीवर इच्छेविरुद्ध जबरीने अत्याचार केला आहे. दरम्यान याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून प्रथम दादर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी सदर गुन्हा ००/२४ नंबरने नारपोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येवून प्रियकराच्या विरोधात पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी रात्री प्रियकराला ताब्यात घेऊन अटक केली आहे. (Bhivandi News )