Vasai-Virar | वसई, विरार, नालासोपाऱ्यात फेरीवाले वाढले

पदपथावरून मार्ग काढणे झाले कठीण; तोडगा काढण्याची मागणी
Vasai-Virar
फेरीवाल्यांनी मिळेल त्या जागेत बस्तान बसवल्याने पदपथावरून मार्ग काढणे झाले कठीण झाले आहे pudhari
Published on
Updated on

खानिवडे : वसई, विरारमध्ये फेरीवाल्यांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ चिंताजनक ठरत असून कामावर जाण्याच्या व परत येण्याच्या वेळी होणान्या गर्दीतून रेल्वे स्थानकांमधून बाहेर पडताना लागणाऱ्या पदपथावरून मार्ग काढणे कठीण होऊ लागले आहे. यावर पालिकेमार्फत त्वरित उपाययोजना करण्याच्या मागणीला आता जोर येत आहे. फेरीवाल्यांची संख्या वाढल्याने उपाययोजना न केल्यास येत्या काही वर्षात या समस्येस जटील स्वरूप येऊन वाहतूक कोंडीसह विविध अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे पालिकने ठेका पद्धतीवर दिलेल्या बाजारकर वसूलीमुळे ठेकेदार केवळ १० ची पावती देऊन १०० ते २०० रुपये वसूल करत असल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण आता फेरीवाले बिनदिक्कीत रस्त्यावर अतिक्रमण करत आहेत. पालिकेच्या अनेक भागातील बाजारांची कर वसुली करण्याची मुदत संपलेली आहे. तरी सदरची प्रक्रिया विनानिविदा मागील काही वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे याचे नक्की गुपित काय आहे. हा संशोधनाचा विषय आहे. याची रौतसर चौकशी होणे ही आवश्यक आहे.

आजमितीस एकट्या आय प्रभागात ५० अधिकृत फेरिवाले आहेत. तर बेकायदा फेरिवाल्यांची संख्या १७५० च्या घरात आहे. त्यांच्याकडून पावतीद्वारे वसूल होणारा महसूल अत्यल्प आहे. मात्र वरती मिळणारा मासिक मालिदा लाखांच्या घरात आहे, अधिकारी व ठेकेदार बांच्या संगनमताने ही वसूली सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. वसई-विरार मनपा हद्दीत अनेक ठिकाणी आठवडे बाजार, दैनंदिन बाजार भरतात. यात त्यांनी विविध ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत हेतू पुरस्सर यावर कारवाई होत नसल्याने वसई, नालासोपारा, विरार भागात विविध ठिकाणी आर्थिक व्यवहार करून अतिक्रमण करण्यास मुभा दिली जात नाही ना आहि शंका उपस्थित होते.

मिळेल त्या जागेत फेरीवाल्यांचे बस्तान

वसई तालुक्यातील पालिका क्षेत्रातील वसई, विरार, नालासोपारा व नवघर- माणिकपूर या चारही शहरात अश्या विक्रेत्यांची संख्याच प्रचंड मोठी आहे. पालिकेकडे त्यांची निक्षित आकडेवारी नाही. पालिकेने फेरीवाला झोन व ना फेरीवाला झोन तयार केलेला नाही. त्यामुळे मिळेल त्या जागेत फेरीवाले पथारी पसरतात. आम्ही नियुक्त करापेक्षा चार पटीने जास्त पैसे देतो, हप्ता पोहोचवतो त्यामुळे जागा वापरतो, असे नाव न सांगण्याच्या अटीवर फेरीवाले सांगत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news