तलासरी : महाराष्ट्राच्या सीमेवरील गुजरात राज्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भिलाड येथे बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या १४ व्यक्तींना अटक करण्यात गुजरात पोलिसांना यश आले आहे. पालघर जिल्ह्यातील अच्छाड तलासरीच्या सीमेवरील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्याच्या भिलाड येथे हॉटेल क्रिस्टल इन हॉटेल मध्ये अवैधपणे बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी तथा भारतीय नागरिकांचे फसवणूक करून आर्थिक लूट केली जात असल्याची माहिती गुजरातच्या सुरत आयजी सायबर क्राईम टीमला मिळाली होती त्या अनुषंगाने या अवैध बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून गुजरात पोलिसांनी १४ जणांना अटक केली. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.
या बोगस फोन कॉल सेंटरच्या माध्यमातून देशी विदेशी नागरिकांना विविध योजनांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळवले जात होते. पोलिसांनी छापा टाकताच हॉटेल क्रिस्टल इन मध्ये एका रूमच्या खोलीत कॉम्प्युटर सहित अनेक दस्तावेज पण ताब्यात घेतल्याची माहिती गुजरात पोलिसांमार्फत देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले १४ आरोपी सर्व मुंबई स्थित असून हॉटेल क्रिस्टल इन मध्ये रूम भाड्याने घेऊन अवैध बोगस कॉल सेंटर चालवत होते.
याबाबत सुरत सायबर क्राईम टीम अधिक तपास करीत असून देश विदेशात या बोगस कॉल सेंटर द्वारे किती जणांना गंडा घातला आहे. याचा कसून तपास गुजरात पोलिस करीत असून १४ जणांवर भिलाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर सनी पांडे नामक व्यक्तीचा तसेच अज्ञात काही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
बोगस कॉल सेंटरमधून अटक करण्यात आलेल्यांध्ये जरार उर्फ मिसाम आलमदार हैदर, अझरुल इस्लाम रिझर्व्ह मलेक, संकेत नरेंद्र मकवाना, दलजितसिंग जगदीश सलोजा, सोचेब इकबाल शेख, अरफद सर्फराज सिद्दीकी, तनवीर रफिक खान, समीम शाहिद खान, फहीम अब्दुल गफ्फार शेख, सुबोध प्रकाश भालेकर, राहुल किशन सरसर, इग्नेशियस जेफ्र मेस्फर्नेश, हर्षदा विजय उतेकर, माधुरी उर्फ निक्की सुधीर पैकर (सध्या भिलाड क्रिस्टल इन हॉटेलमध्ये राहणारी मूळची मुंबई, महाराष्ट्रात राहणारी) वॉन्टेड आरोप मुंबईत राहणारी सनी पांडे यांचा समावेश आहे.