Bhiklya Dhinda: मनोरच्या महाराजांच्या चरणी पद्मश्री भिकल्या धिंड्या; तारप्याच्या सुरांनी पालघरच्या संस्कृतीचा गौरव

पालघरचे ज्येष्ठ तारपा वादक पद्मश्री भिकल्या धिंड्या यांनी मनोरच्या महाराजा गणपतीचे दर्शन घेतले. गणेश मंडळाच्या वतीने त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
Bhiklya Dhinda
Bhiklya DhindaPudhari
Published on: 
Updated on: 

पालघर: आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा आपल्या कलेतून जपणारे आणि पालघर जिल्ह्याची आन-बान-शान ठरलेले ज्येष्ठ तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंड्या यांनी बुधवारी मनोरच्या महाराजा गणपतीचे दर्शन घेत गणरायाचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह गणेशभक्तांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

मनोरच्या महाराजा गणपती मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी, सन्मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन भिकल्या धिंड्या यांचा गौरव करण्यात आला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित या ज्येष्ठ लोककलावंताची एक झलक पाहण्यासाठी तसेच त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणरायाच्या दर्शनानंतर तारप्याच्या सुरांनी परिसरातील वातावरण आणखी भक्तिमय झाले.

Bhiklya Dhinda
Thane Noise Pollution: डीजे-डॉल्बीचा दणदणाट कमी; ढोल-ताशा, बेंजोमुळे मात्र ध्वनिप्रदूषण कायम

मनोरच्या महाराजा गणपतीचा गणेशोत्सव हा परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा आणि उत्साहाचा केंद्रबिंदू मानला जातो. गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे मनोर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. यंदाच्या उत्सवात पद्मश्री भिकल्या धिंड्या यांच्या उपस्थितीमुळे या उत्साहाला आदिवासी लोककलेची अनोखी जोड मिळाली.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे रहिवासी असलेले भिकल्या धिंड्या यांनी आपले संपूर्ण आयुष्य आदिवासी वारली संस्कृती आणि पारंपरिक तारपा वादनाच्या जतनासाठी समर्पित केले आहे. त्यांच्या कुटुंबात सुमारे १५० वर्षांपासून तारपा वादनाची परंपरा असून वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून त्यांनी ही कला आत्मसात केली.

आठ दशकांहून अधिक काळ ते तारपा वादन करत असून त्यांच्या कलेने पालघरच्या आदिवासी संस्कृतीला देश विदेशात ओळख मिळवून दिली आहे. तारपा हे केवळ वाद्य नसून आदिवासी समाजाच्या जीवनाशी, नृत्याशी आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला अविभाज्य भाग आहे. ही परंपरा जपण्यासाठी दिलेल्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने २०२६ मध्ये भिकल्या धिंड्या यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

Bhiklya Dhinda
Neral Kashele Student Bus Service: बससेवा बंद होताच २५० विद्यार्थ्यांची पुन्हा पायपीट; शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

मनोरच्या महाराजांच्या चरणी पद्मश्री तारपा वादकाचा झालेला सन्मान हा गणेशोत्सवातील धार्मिक श्रद्धेसोबतच पालघरच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा गौरव ठरला. तारप्याच्या सुरांचा मान पालघरच्या संस्कृतीचा अभिमान या भावनेतून गणेशभक्तांनी भिकल्या धिंड्या यांचे मनापासून स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news