Palghar Crime : पालघरमधील बेकायदा कॉल सेंटरवर कारवाई

पाच आरोपींना अटक, लॅपटॉप आणि 12 मोबाईल फोन हस्तगत
Police Raid on Call Center
पालघरमधील बेकायदा कॉल सेंटरवर कारवाईpudhari photo
Published on
Updated on

पालघर : बनावट कॉल सेंटरवर पालघर पश्चिमेच्या माहीम हद्दीत एका इमारतीतील सदनिकेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत कारवाई केली आहे. बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच आरोपींना अटक केली आहे.

पालघर पश्चिमेकडे माहीम हद्दीत सुंदरम शाळेजवळ असलेल्या एका रहिवाशी इमारतीत बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिया एकांत या इमारतीच्या 303 क्रमांकाच्या सदनिकेत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. यावेळी यादरम्यान पाच जण सदनिकेत बनावट कॉल सेंटर चालवत असल्याचे आढळून आले.

Police Raid on Call Center
Direction Boards Theft : शहापूरमध्ये दिशादर्शक फलक भंगार चोरांच्या निशाण्यावर

पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. भरत लोकू लालवानी, रोहित राजेंद्र निंबाळकर, रोहित मिलिंद झोऱ्हे, अमरदीप अंग्रेज गिल, सागर बलदेव पठाडिया अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींकडून 4 लॅपटॉप, 12 मोबाईल फोन, 4 हेडफोन, राऊटर, एअरटेल कंपनीचे एक डोंगल असा 5 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अमेरिकेतील नागरीकांचे मोबाईल फोन नंबर, नाव व इतर माहिती बेकायदेशीररित्या संकलित करुन त्या माहीतीच्या आधारे अमेरीका देशातील लोकांना मायक्रोसॉफट, ॲप्पल कंपनीचे प्रतिनिधी बोलत आहोत असे सांगुन तुमच्या डिव्हाईसमध्ये व्हायरसने प्रवेश केला आहे असे बोलून नंतर त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचे डिव्हाईस हॅक झाले झाल्याची बतावणी आरोपी करत होते.

Police Raid on Call Center
Mumbai News : मुंबईतील या रस्त्यांचे, चौकांचे आज नामांतरण होणार ?

त्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लावेस गिफ्ट कार्ड, एप्पल गिफ्ट कार्ड, नाइकी गिफ्ट कार्ड, ॲमेझॉन गिफ्ट कार्डचे कमीत कमी प्रत्येकी 500 अमेरिकन डॉलर किंवा 4000 अमेरिकन डॉलरचे गिफ्ट कार्ड अमेरिकेतील नागरिकांकडून घेऊन सदर गिफ्ट कार्ड्सची रक्कम युएसडीटीमध्ये परावर्तित करून ही रक्कम हवालाद्वारे मिळवून या आरोपींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले, असता त्यांना 28 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कारवाई पालघरचे पोलीस यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील, सपोनि.अनिल व्हटकर, योगेश शिंदे, पोउपनि. गोरखनाथ राठोड, श्रेपोउपनि. राजेश वाघ, पोहवा. कपिल नेमाडे, भगवान आव्हाड, राकेश पाटील, संदिप सुर्यवंशी, दिलीप जनाठे, दिपक राऊत, नरेंद्र पाटील, पोअं.बजरंग अमनयाड, नरेश घाटाळ, सर्व नेमणूक स्वानिक गुन्हे शाखा, पालघर तमेच पोअं. रामदास दुर्गेष्ट, नेमणूक सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news