Mumbai News : मुंबईतील या रस्त्यांचे, चौकांचे आज नामांतरण होणार ?

पहिल्या सर्वसाधारण मासिक सभेत तब्बल चार वर्षांपासून रखडलेले रस्ते, पूल, चौकांच्या नामांतरणाचे 20 प्रस्ताव
Road and Bridge Renaming Proposals
मुंबईतील या रस्त्यांचे, चौकांचे आज नामांतरण होणार ?pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या पहिल्या सर्वसाधारण मासिक सभेत तब्बल चार वर्षांपासून रखडलेले रस्ते, पूल, चौकांच्या नामांतरणाचे 20 प्रस्ताव ठेवण्यात आले होते. मात्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव आल्याने या प्रस्तावांवर चर्चा झाली नाही. आता बुधवारी होणाऱ्या सभेत यावर चर्चा होणार असून नामांतरणाची घोषणा होवू शकते.

  • गोरेगाव पश्चिम, बांगूर नगर येथील जलनिधी सोसायटीजवळील रस्त्यास ‌‘भूदरमलजी धनुका रोड‌’ असे नाव देण्यात येईल.

  • घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला ‌‘छत्रपती शिवाजी महाराज फ्लायओव्हर‌’ असे नाव देण्यात येईल.

  • अंधेरी पश्चिम, बांडिवली हिल येथील रस्त्यास ‌‘ॐ शिव शंकर मंदिर मार्ग‌’ असे नाव देण्यात येईल.

  • अंधेरी पश्चिम, निर्मल हॉटेलजवळील रस्त्यास ‌‘संगीतकार बप्पी लहरी मार्ग‌’ असे नाव देण्यात येईल.

  • चेंबूर, संडू गार्डनजवळील रस्त्यास ‌‘आचार्य श्री महाश्रवण रोड क्रमांक 17‌’ असे नाव देण्यात येणार आहे.

  • वरळी येथील डॉ. जी. एम. भोसले मार्ग व हुतात्मा रमेश देवरुखकर मार्गाजवळील जंक्शनला ‌‘रामचंद्र म्हामुंकर मार्ग‌’ असे नाव देण्यात येईल.

  • परळ, आर. एम. भट शाळेजवळील रस्त्यास ‌‘परळची देवी मार्ग‌’ आणि जेरबाई वाडिया मार्गाजवळील रस्त्यास ‌‘वसंतराव विष्णू चोकेकर मार्ग‌’ असे नामकरण करण्यात येईल.

  • गुलमोहर रोडजवळील रस्त्यास ‌‘गुलमोहर क्रॉस रोड 7 एक्स्टेंशन‌’ आणि त्याच परिसरातील दुसऱ्या रस्त्यास ‌‘गुलमोहर क्रॉस रोड 7 कनेक्टिंग लेन‌’ अशी नावे देण्यात येणार आहेत.

  • काळा घोडा परिसरातील चौकाचे नामकरण ‌‘सायमन पेरेस चौक‌’ असे होणार आहे.

  • अंधेरी पश्चिम, दत्ताजी साळवीजवळील चौकाचे ‌‘शेठ के. डी. पोद्दार चौक‌’ तसेच कुर्ला पूर्व येथील चौकाचे ‌‘गौतम साबळे चौक‌’ असे नामकरण करण्यात येणार आहे.

  • मुलुंड पश्चिम, हिमांशू रॉय व जकरिया रोडवरील चौकाचे नामकरण ‌‘आचार्य श्री महाप्रज्ञ चौक‌’ असे करण्यात येईल.

  • पवई येथील जंक्शनला ‌‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक‌’ असे नाव देण्यात येणार आहे.

  • वरळी येथील स्विमिंग पुलाचे ‌‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव‌’ असे नामकरण होणार आहे.

  • मालाड पश्चिम येथील जलतरण तलावाला ‌‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जलतरण तलाव‌’ असे नाव देण्यात येईल.

  • लालबाग येथील बॉम्बे गॅस लेनमधील मैदानाचे नामकरण ‌‘योगेश पाटील मनोरंजन मैदान‌’ असे होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news