पालघर : नालासोपाऱ्यात १० लाखांचे कोकेन जप्त; नायजेरियन आरोपीला अटक

पालघर : नालासोपाऱ्यात १० लाखांचे कोकेन जप्त; नायजेरियन आरोपीला अटक

नालासोपारा :  नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकाटीकरण पथकाने नालासोपारा पूर्व परिसरातून एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे, त्याच्याकडून लाखो रुपयांचे कोकेन नावाचे ड्रग्ज सापडले आहे. काही दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसरात तुळींज पोलिसांनी एका नायजेरियनकडून ५८ लाख ७४ हजार रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. त्यानंतर नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव तालाब येथे तुळींज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनी ५४ वर्षीय नायजेरियन व्यक्तीला कोकेन ड्रग्जसह अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियन व्यक्ती कोकेन विकण्यासाठी आला होता, एका गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करत पोलिसांनी त्याला पकडले. ओके चिमा गॅम्ब्रिल अंगू असे आरोपीचा नाव आहे. या नायजेरियन आरोपीकडून १० लाख ४० हजार रुपये वजनाचे १०४ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले आहे, आरोपी नायजेरियनविरुद्ध तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news