बेपत्ता मुलगी सापडली पश्चिम बंगालमध्ये

बेपत्ता मुलगी सापडली पश्चिम बंगालमध्ये

विक्रमगड; पुढारी वृत्तसेवा : विक्रमगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावी पाहुणी म्हणून आलेल्या मुलीस फूस लावून पळविण्यात आले होते. तिचा शोध लावण्यात विक्रमगड पोलिसांना यश आले असूही मुलगी पश्चिम बंगालमध्ये सापडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टेटवाली गावी आपल्या नातेवाईकांच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या १७ वर्षीय मुलीस विक्रमगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एका इसमाने फूस लावून फेब्रुवारी २०२१ मध्ये पळवून नेले होते. दोन वर्षांपासून पोलिस त्यांच्या मागावर होते. पण, ती सापडत नव्हते. दरम्यान, विक्रमगड पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश जगताप, पोलिस हवालदार रघुनाथ चौधरी व महिला पोलिस शिपाई लोखंडे यांनी तांत्रिक यंत्रणेच्या आधारे शोध घेऊन त्यांना पश्चिम बंगाल येथील कालीचक तहसील येथून शोधून काढण्यात यश मिळविले आहे. आरोपीचे नाव देवाशिष मंडल असून, त्यास अटक करण्यात आली आहे. त्यास दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या कामगिरीमुळे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, उपनिरीक्षक सतीश जगताप व त्यांच्या टीमचे अभिनंदन होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news