पोलिसात नोकरी देण्याच्या आमिषाने इन्स्टा फ्रेंडने महिलेला २ लाखात विकले | पुढारी

पोलिसात नोकरी देण्याच्या आमिषाने इन्स्टा फ्रेंडने महिलेला २ लाखात विकले

नालासोपारा; पुढारी वृत्तसेवा :  महिलानो सोशल मीडियावर पोलिसात नोकरी शोधताय तर सावधान आपली फसवणूक होवू शकते अनोळखी इसमासोबत दोस्ती करताय तर ही बातमी धक्का देणारी आहे. पोलिसात नोकरी देण्याच्या आमिषाने एका इन्स्टा फ्रेंडने एका महिलेला चक्क औरंगाबादला नेवून राजस्थानला २ लाखात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली असून अर्नाळा पोलिसांनी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी अर्नाळा पोलिसांचे पथक पाठवून २७ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात यश मिळाले आहे. याप्रकरणी विकत घेणाऱ्या आरोपी चेतन भारती याला पोलिसांनी अटक केली असून फरार ३ आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

अर्नाळ्यातील एक २७ वर्षीय महिलेच इन्स्टा फ्रेंडच्या नादी लागून पोलिसात भर्ती होण्याचे स्वप्न भंगले आहे. पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून सोशल मीडियावर कुठे भर्ती आहेका कुठे ट्रेनिंग मिळतेय का याचा शोध घेत असताना आरोपी दिनेश पुरी याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आर्मीचे, पोलीस ट्रेनिंगचे फोटो पीडितेला पाठवले त्यानंतर काही दिवसांनी तिला औरंगाबाद येथे पोलीस भर्तीचे ट्रेनिंग आहे असे सांगून तिला ११ जानेवारीला ९.५५ ची ट्रेन पकडून औरंगाबादला बोलावले. ती पहाटे ५ वाजता औरंगाबाद येथे पोहोचल्यानंतर तिचा इन्स्टा फ्रेंड दिनेशने तिला राजस्थानच्या पोलिसात तुझ काम झाले आहे. तू १०. १५ ची राजस्थान ट्रेन पकडून
पालंगपूर रेल्वे स्टेशनवर उत्तर तिथे गेल्यावर तिला पालंगपूर बस डेपोतून भीमनाल येथे रात्री पोहोचली असता तिला घेण्यासाठी चेतन भारती, भावेश पुरी, मसर पुरी हे आले होते. त्यानंतर तिला चेतनच्या बहिणीच्या घरी नेवून घुंगट घागरा घालून भिमनाल कोर्टात १६ जानेवारीला लग्न लावले. एका कार मध्ये घालून २ दिवस फिरवत होते.

राजस्थान गाठून पीडितेची सुटका

तिसऱ्या दिवशी पुन्हा चेतनच्या बहिणीच्या घरी घेवून गेले तेव्हा पीडितेने मला इथे का आणले असे विचरल्यावर त्यांनी आम्ही तुला २ लाखांना विकत घेतले असून दिनेशला दिलेल्या पैशांचा स्क्रीन शॉट दाखवला व चेतनसोबत तुझे लग्न झाले असून आम्ही सांगू तस कराव लागेल, असे सांगितले. त्यानंतर चेतनच्या शिवानी बालोत्रा गावी तिला सोडण्यात आले. त्यानंतर तिची तब्येत बिघडल्यावर दवाखान्यात दाखवून तिला पुन्हा घरी नेण्यात आले. त्यावेळी तेथील एका इसमाच्या मोबाईलवरून पीडितेने आपल्या बहिणीला फोन करून सांगितल्यावर बहिणीने अर्नाळा पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ राजस्थान गाठून पीडित महिलेची सुटका करून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दिनेश पुरी, मसर पुरी, भावेश पुरी आणि नवरोबा चेतन भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चेतन यास अटक केली आहे. पुढील तपास अर्नाळा पोलीस करीत आहेत.

Back to top button