

पालघर ः आंतर जिल्हा बदल्या आणि दिवाळीच्या सुट्टी दरम्यान ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे पालघर तालुक्यातील 38 जिल्हा परिषद शाळा शून्य शिक्षकी ठरल्या आहेत. शिक्षण विभागाकडून दोन किंवा तीन शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षकांना शून्य शिक्षकी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नियोजन कोलमडले असुन दोन शिक्षकांची आवश्यकता असलेल्या शाळांमध्ये एक शिक्षक तसेच पेसा तत्वावरील कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मराठी माध्यमातील शिक्षकांची सहा हजार 326 पदे मंजूर असताना सर्वाधिक एक हजार 111 पदे रिक्त आहेत.उर्दू माध्यमातील रिक्त पदांची टक्केवारी 31.53 टक्के आहे. गुजराती माध्यमातील शिक्षकांच्या मंजूर 42 पदांपैकी 14 पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा अंतर्गत मराठी, उर्दू, हिंदी आणि गुजराती माध्यमाच्या मंजूर सहा हजार 497 पदांपैकी एक हजार 163 पदे रिक्त आहेत.
माध्यम मंजूर पदे कार्यरत रिक्त टक्केवारी
मराठी 6326 5215 1111 17.56 %
उर्दू 111 76 35 31.53 %
गुजराती 42 28 14 33.33 %
हिंदी 18 15 03 16.67 %
एकूण 6497 5334 1163 17.90 %
जिल्हा परिषदेतील तालुकानिहाय पटसंख्या तालुका पटसंख्या
डहाणू 90059, (90059)
जव्हार 28578 ,(28578)
मोखाडा 18744, (18744)
पालघर 115984, (115984)
तलासरी 45011, (45011)
वसई 375345 ,(375345)
विक्रमगड 32746 ,(32746)
वाडा 43307 , (43307)
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंतर जिल्हा बदलीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.नवीन शिक्षक भरती होईपर्यंत आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला होता. पालघर तालुक्यात 38 शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत. जिल्ह्यात शून्य शिक्षकी शाळांची संख्या दोनशे पेक्षा अधिक असेल. शिक्षण विभागातील आर्थिक गैरव्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास होण्याची आवश्यकता आहे.
शिवा सांबरे, माजी शिक्षण सभापती, जिल्हा परिषद,पालघर.