

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालघर येथील वाडा पोलिसांनी 3 कोटी 70 लाखांची रोकड जप्त केली. ही रोकड घेऊन एक चारचारी वाहन जात होते, यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली. कारचालकाला या पैशाची विचारणा केली असता त्यांने एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र त्याच्याकडे कोणतेही कागदपत्रे नव्हती म्हणून ही रोकड जप्त करण्यात आली.
या घटनेबाबत चालक व कार पोलीस ठाण्यात आणली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही कार ऐरोली, नवी मुंबई येथून वाडा, विक्रमगड येथे जात होती, ही कार एका कंपनीची आहे आणि त्यांनी दावा केला की एटीएममध्ये पैसे भरायचे होते परंतु त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या रकमेची आवश्यक कागदपत्रे नव्हती म्हणून आम्ही आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रोख जप्त केली करून कारवाई केली आहे, असे वाडा पोलिसांनी सांगितले आहे.