

मुंबई : मुंबईच्या भूलेश्वर परिसरात भरारी पथकाने २ कोटी ३० लाख ८६ हजारांची रोकड जप्त केली. रोकड घेऊन जाणाऱ्या १२ जणांना भरारी पथकाने ताब्यात घेतले असून पोलीस आणि भरारी पथक अधिक चौकशी करत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून कडक नजर ठेवली जात आहे. ठिकठिकाणी निवडणूक आयोगाने मुंबई पोलिसांच्या चौकी तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत. भरारी पथकाने २ कोटी ३० लाख ८६ हजारांची रोकड जप्त केली. ही रोकड मिळाल्यानंतर १८६ मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे एफ.एस.टी. पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. एफ.एस.टी. पथक नोडल अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या रोकडची व्हिडीओग्राफी करुन संशयीतांना लो.टी.मार्ग पोलीस ठाणे येथे पुढील कारवाईसाठी आणण्यात आले आहे. दरम्यान, या पैशांच्या अधिक चौकशीसाठी रोकड आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या कार्यालयात घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.