शेतीला येतोय आधुनिकतेचा साज | पुढारी

शेतीला येतोय आधुनिकतेचा साज

पोलादपूर : समीर बुटाला
पावसाळा आला म्हणजे ग्रामिण भागात डोळ्यासमोर उभी राहते हिरवीगार शेती. शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणार्‍यांचा घुमणारा आवाज. सोबतच नांगर ओढणारी बैलांची जोडी. मात्र, आजच्या आधुनिक काळात ही बैलांची नागरणी कमी होत असून, त्याऐवजी शेतकरी पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टर नांगरणी वापराकडे वळतात दिसत आहेत.

पूर्वी शेतकरी म्हटला म्हणजे त्यांच्याकडे असणारी डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक दोन जोड्या आणि बैलगाडी असे चित्र असे. एकदा जून महिना उजाडला की, शेतकरी जमीन मशागतीसाठी नांगर दुरुस्ती करणे, नवीन नांगर तयारकरणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने बैल आणणे, नांगरणी व चिखलणीसाठी लागणार्‍या फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे अशा कामांची शेतकरी वर्गाची लगबग सुरू होत असे. ग्रामिण भागातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी बैल जोडी किंवा ट्रॅक्टर नांगरणी किंवा पॉवर टिलर वापरु लागला आहे. लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकर्‍यांचा वेळ, पैसा तसेच शारिरीक श्रम देखील वाचत असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button