महागाईचे चटके ! साबण-डिटर्जंट 20 ते 30 टक्क्यांपर्यंत महागले

महागाईचे चटके ! साबण-डिटर्जंट 20 ते 30 टक्क्यांपर्यंत महागले
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंडोनेशियाने पामतेलावरील निर्यातबंदी हटविली असली तरी किमती प्रचंड वधारल्याने गेल्या दोन महिन्यांपासून साबणासह डिटर्जंट पावडरच्या दरात 20 ते 30 टक्क्यांची दरवाढ करण्यात आली आहे. एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला असताना, दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महागाईत भर पडत असून, पेट्रोल-डिझेलच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. वाहतूक महागल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. त्यात आता प्रत्येक घरात दररोज लागणारे अंगाचे, भांड्याचे व कपड्याचे साबण, डिटर्जंट पावडर, शाम्पू यांच्या महागाईची भर पडली आहे. साबणासाठी कच्चा माल म्हणून लागणारे पामतेल वधारल्याने दोन महिन्यांत साबण व तत्सम वस्तूंच्या दरात 20 ते 30 टक्के वाढ झाली आहे. साबणाच्या प्रत्येक खेपेत प्रतिनग दोन ते तीन रुपयांनी वाढ होऊन येत असल्याचे किराणा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तेलासारख्या अन्य ठोक वस्तूंच्या किमतीतील वाढ लक्षात येते. मात्र, साबणासारख्या वस्तूंच्या किमतीतील वाढ ग्राहकांना चटकन समजत नाही, असेही काही दुकानदारांनी सांगितले.

वजनात कमी करण्याचीही चलाखी
एका कंपनीच्या 125 ग्रॅमच्या अंगाच्या साबणाची वडी पूर्वी 29 रुपयांना मिळत होती. ती आता 34 रुपयांवर पोहोचली आहे. अन्य एका कंपनीच्या कपडे धुण्याच्या साबणाच्या वडीचे चार बार पूर्वी 99 रुपयांना मिळत होते. ते आता तब्बल 142 रुपयांवर गेले आहेत. एका कंपनीच्या एक किलोच्या वॉशिंग पावडरचे पाऊच 63 वरून 73 रुपयांवर, तर अन्य एका कंपनीची वॉशिंग पावडर 83 वरून 100 रुपयांवर गेली आहे. काही कंपन्यांनी प्रत्यक्ष दरवाढ न करता साबणाच्या वडीचे वजन कमी करण्याची चलाखी केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news