नाशिकमध्ये सारथी प्रशिक्षण केंद्रास मान्यता, खासदार हेमंत गोडसे यांची माहिती

हेमंत गोडसे,www.pudhari.news
हेमंत गोडसे,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेच्या शाखेला नाशिक येथे शासनाने सहा हजार चौरस मीटर जागा दिली आहे. शासनाने दिलेल्या या जागेवर लवकरात लवकर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, मुला-मुलींसाठी वेगवेगळे वसतिगृह तसेच विविध प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजातील नेते प्रयत्नशील आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे केंद्र फक्त पुणे येथेच होते. या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका, वसतिगृह आणि इतर प्रशिक्षण दिले जाते. यासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना पुणे येथील सारथी केंद्रात प्रवेश घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होते. सारथीचे केंद्र राज्यातील सहाही मुख्यालयी शहरांमध्ये व्हावे, यासाठी वर्षभरापासून गोडसे प्रयत्नशील होते. मागील वर्षी गोडसे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत राज्यातील महसुली शहरांमध्ये सारथीचे केंद्र व्हावे, यासाठी मागणी केली होती. यासाठी खा. गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे आता नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील मराठा समाजातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे येथील सारथी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.
– हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

खा. गोडसे यांच्या मागणीची दखल घेत शासनाने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात सारथीचे नाशिक येथे केंद्र उभारणीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवर असलेल्या पंचायत समिती कार्यालयाजवळील सर्व्हे क्र. 1056, 1057 एकरमधील 0.60 हेक्टर म्हणजेच सहा हजार चौरस मीटर या शासकीय जागेवर सारथीचे केंद्र उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news