नाशिक/सिडको : जांभळाचा मोह बेतला जीवावर, झाडावरुन पडून युवकाचा मृत्यू

नाशिक/सिडको : जांभळाचा मोह बेतला जीवावर, झाडावरुन पडून युवकाचा मृत्यू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक दुर्गा देवी मंदिराच्या पाठीमागे जांभळाच्या झाडावर जांभळ तोडण्यासाठी गेलेले गणपत महादू वळवी (35) रा. पाटील नगर यांचा झाडावरून पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की,  गणपत वळवी हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्रिमूर्ती चौक देवी मंदिर मागील भागात झाडावर जांभळं तोडण्यासाठी गेले होते. झाडावरून पाय घसरल्याने ते खाली कोसळले व त्यांना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार चव्हाण अधिक तपास करत आहे.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news