नाशिक : शहरात सहा विभागांत बसविणार स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र, ‘असा’ होईल फायदा

नाशिक : शहरात सहा विभागांत बसविणार स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र, ‘असा’ होईल फायदा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा अंदाज येऊन हानी टाळण्यासाठी तसेच नागरिकांना आधीच अलर्ट करण्याकरिता महापालिका शहरातील सहा विभागांत प्रत्येकी एक असे सहा स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविणार आहे. सहा विभागांतील अग्निशमन केंद्रात संबंधित यंत्र बसविण्यात येणार आहे.

पावसाची तसेच धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याची माहिती दर तासाला मिळावी, याकरिता जलसंपदा विभागाला महापालिकेचे पत्र सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्त रमेश पवार यांनी आपत्ती निवारण केंद्राला दिले आहेत. पावसाळ्यात शहरातून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहून जात गोदावरी तसेच इतर उपनद्यांच्या पात्रात मिसळते, तर दुसरीकडे गंगापूर धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जातो. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन त्यात नदीकाठवरील नागरिकांच्या मालमत्तेचे तसेच इतरही नुकसान होते. 2008 मध्ये अशाच प्रकारे महापुराने नाशिकला तसेच नदीकाठावरील गावातील नागरिकांना मोठ्या हानीला सामोरे जावे लागले होते. महापालिकेच्या आपत्ती निवारण केंद्राला जलसंपदा विभागाकडून पाणी सोडण्याची माहिती मिळाल्यास हानी टाळता येऊ शकते. त्यामुळे शहरातील पावसाची अद्ययावत स्थितीची माहिती मिळविण्यासाठी सहा विभागांत स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा निर्णय पवार यांनी घेतला.

मदत पथकाला ड्रेसकोड
महापालिकेचे सर्व विभागीय अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना दक्ष राहण्याचे आदेश पवार यांनी दिले असून, आपत्तीकाळात मदत कार्यासाठी रस्त्यावर उतरणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना महापालिका स्वतंत्र ड्रेसकोड देणार आहे. दुर्घटनेत नागरिक आणि मदतकार्य करणारे कर्मचारी ओळखले जावेत, यासाठी मनपाने ड्रेसकोडचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news